जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / उदरांनी घरात उच्छाद मांडलाय? या सोप्या घरगुती उपायांनी लावा त्यांना पळवून

उदरांनी घरात उच्छाद मांडलाय? या सोप्या घरगुती उपायांनी लावा त्यांना पळवून

उदरांनी घरात उच्छाद मांडलाय? या सोप्या घरगुती उपायांनी लावा त्यांना पळवून

घरात उंदरांची संख्या वाढली की चांगलाच डोक्याला ताप होतो. उंदीर घरात घाण पसरवून अनेक गंभीर आजारांना जन्म देण्यास मदत करतात. त्याचबरोबर उंदीर अनेकदा घरातील तारा, कपडे, बूट कुरतडून आपल्या समस्या वाढवण्याचे काम करतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै : उन्हाळा आणि पावसाळ्यात घरांमध्ये किडे-कीटकांची दहशत खूप वाढते. मात्र, घरात येणाऱ्या किटकांपासून काही प्रमाणात सुटका होऊ शकते. पण उंदरांना घराबाहेर काढणे फार कठीण काम असते. पावसाळ्यात उंदरांची बिळे सहसा पाण्याने भरतात. त्यामुळे उंदीर घरात घुसून दहशत निर्माण करतात. घरात घुसलेले उंदीर बाहरे काढण्याच्या काही सोप्या आणि घरगुती पद्धती आहेत. उंदरांपासून कशी सुटका करायची याविषयी जाणून (Tips and tricks) घेऊया. घरात उंदरांची संख्या वाढली की चांगलाच डोक्याला ताप होतो. उंदीर घरात घाण पसरवून अनेक गंभीर आजारांना जन्म देण्यास मदत करतात. त्याचबरोबर उंदीर अनेकदा घरातील तारा, कपडे, बूट कुरतडून आपल्या समस्या वाढवण्याचे काम करतात. यासाठी आज आपण उंदरांना घरातून पळवून लावण्याचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. पेपरमिंट तेल वापरा उंदरांना पळवून लावण्यासाठी आपण पेपरमिंट तेल वापरू शकता. उंदरांना पुदिन्याच्या तेलाचा वास अजिबात सहन होत नाही. कापूस पेपरमिंट तेलात बुडवून लावून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवू शकता. यामुळे घरातून उंदीर नाहीसे होतील. याव्यतिरिक्त, पेपरमिंट तेल तुमच्या घरासाठी रूम फ्रेशनर म्हणून देखील काम करेल. कांदा उपयुक्त ठरेल - कांद्याच्या वासानेही उंदीर पळू लागतात. काही कांदे कापून कोपऱ्यात ठेवू शकता. मात्र, कांदे लवकर सुकतात. त्यामुळे दर 2-3 दिवसांनी कांदा बदलत राहा. यामुळे तुमच्या घरात उंदीर अजिबात प्रवेश करणार नाहीत. उंदीर मारण्यासाठी घरगुती उपाय - उंदरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कोको पावडर वापरून होममेड रॅट किलर बनवू शकता. उंदरांना कोको पावडर खूप आवडते. त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस टाकल्याने ते उंदरांच्या आतड्यात अडकते आणि उंदीर मरतात. हे वाचा -  ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा लाल मिरची - लाल मिरचीमुळे देखील उंदीर पळून जातात. उंदरांना न मारता घरातून हाकलण्यासाठी तुम्ही लाल मिरची वापरू शकता. यासाठी उंदरांच्या जागी लाल तिखट किंवा सुकी लाल मिर्ची ठेवा. यामुळे उंदीर घरातून पळून जातील. हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर घर स्वच्छ ठेवा उंदीर घरातून बाहेर पडल्यानंतर घर स्वच्छ करायला विसरू नका. यासाठी सर्वात आधी घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडा. त्यानंतर कागद, कापड किंवा हातमोजे यांच्या साहाय्याने उंदरांची विष्ठा स्वच्छ करा आणि घर पूर्णपणे स्वच्छ करा. त्यामुळे घराची स्वच्छता राखली जाईल आणि रोगराई पसरण्याची भीती राहणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: lifestyle
  • First Published :
जाहिरात
जाहिरात