जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Parenting Tips: मुलं खोटं बोलू लागलीयत का? न रागावता त्यांना या गोष्टी सांगून बघा परिणाम

Parenting Tips: मुलं खोटं बोलू लागलीयत का? न रागावता त्यांना या गोष्टी सांगून बघा परिणाम

Parenting Tips: मुलं खोटं बोलू लागलीयत का? न रागावता त्यांना या गोष्टी सांगून बघा परिणाम

पालकांनी लहानपणापासूनच मुलांना खोटे बोलण्याची सवय लागू नये म्हणून काळजी घ्यायला हवी. यासाठी काही टिप्स फॉलो करून आपण मुलांची ही सवय सुधारू (Parenting Tips) शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जून : मुलांचं बालपण खूप निरागस असतं. अशा स्थितीत मुलांना चांगल्या आणि वाईटातला फरक कळत नाही. यामुळेच अनेक मुले जाणूनबुजून किंवा नकळत काही वाईट सवयींना बळी पडतात. खोटं बोलणे ही अशीच एक सवय आहे. मुलं अनेकदा आपल्या चुका लपवण्यासाठी पालकांशी खोटं बोलू लागतात. अनेक मुलांच्या बाबतीत असे घडते, यासाठी काही पद्धती वापरून आपण मुलांच्या वाईट सवयी (Bad habits) सोडवू शकतो. अर्थातच, लहानपणी मुलांना हुशारीनं खोटं कसं बोलायचं हे माहीत नसतं आणि आई-वडील मुलांचे खोटे बोलणे पटकन पकडू शकतात. पण, जसजशी ती मोठी होतात तसतशी मुलांची ही सवय त्यांच्या वाईट सवयींपैकी एक होऊ लागते. त्यामुळे पालकांनी लहानपणापासूनच मुलांना खोटे बोलण्याची सवय लागू नये म्हणून काळजी घ्यायला हवी. यासाठी काही टिप्स फॉलो करून आपण मुलांची ही सवय सुधारू (Parenting Tips) शकतो. मुलाची खोटे बोलण्याची सवय कशी सोडवायची? मुलांसाठी एक उदाहरण बना - बालपणात, मुले त्यांच्या पालकांच्या बहुतेक चांगल्या आणि वाईट सवयी कॉपी करतात. अशा परिस्थितीत तुम्ही मुलांसाठी आदर्श बनू शकता. यासाठी मुलांसमोर खोटे न बोलण्याचा प्रयत्न करा आणि मुलांनाही खरे बोलायला शिकवा. प्रत्येक चुकीची शिक्षा देऊ नका - प्रत्येक लहानसहान चूक सुधारण्यासाठी पालक अनेकदा मुलांना शिक्षा देण्यास प्राधान्य देतात. मात्र, यामुळे मुलांमध्ये भीती निर्माण होते आणि मुलं अनेकदा आपल्या चुका लपवण्यासाठी खोटं बोलू लागतात. त्याच वेळी, मुले खोटे बोलत असल्याचे आढळल्यास त्यांना शिक्षा करण्याऐवजी, खोटे बोलण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. खोटे का बोलत आहेत याचा विचार करा. हे वाचा -  Diabetes असेल तर या भाज्या चुकून पण खायच्या नसतात; कंट्रोलमध्ये नाही राहणार शुगर खरं बोलण्याचं कौतुक करा - मुलं चुकल्यावर हिंमत दाखवून सगळं खरं सांगत असतील, तर खरं बोलल्याबद्दल त्यांचे कौतुक करायला विसरू नका. यामुळे मुलांना भविष्यातही खरे बोलण्यास प्रोत्साहन मिळेल आणि खोटे बोलणे आपोआप कमी होईल. हे वाचा -  पुरुषांनी नक्की घ्यायला हव्यात या लसी; गंभीर आजारांचा राहत नाही धोका संकटात आधार बना - मुलं जेव्हा त्यांच्या समस्या तुमच्याशी शेअर करतात तेव्हा त्यांच्या चुकीवर त्यांना फटकारण्याऐवजी त्यांच्यासोबत बसून समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. यामुळे, मुले प्रत्येक कठीण प्रसंगी तुम्हाला सत्य सांगून मदत मागण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात