जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Eye Makeup : डोळ्यांच्या सिंपल मेकअपसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स; अनेक प्रसंगी येतील कामी

Eye Makeup : डोळ्यांच्या सिंपल मेकअपसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स; अनेक प्रसंगी येतील कामी

Eye Makeup : डोळ्यांच्या सिंपल मेकअपसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स; अनेक प्रसंगी येतील कामी

How To Do Simple Eye Makeup : डोळ्यांच्या मेकअपसाठी काही खास सोप्या स्टेप्स सांगत आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही ऑफिसला जाताना खास लूक सहज करू शकता. हा मेकअप तुम्ही कधीही करू शकता. हा डोळ्यांचा मेकअप तुम्हाला ट्रेंडी तसेच प्रोफेशनल लुक देईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 मार्च : बर्‍याच मुलींची अशी समस्या असते की, त्या पार्टी वगैरेसाठी डोळ्यांचा मेकअप (Eye Makeup) खूप छान करतात. पण, डोळ्यांचा सिंपल मेकअप किंवा ऑफिस मीटिंगसाठी तयार होण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्या द्विधा मनस्थितीत असतात. डोळ्यांचा मेकअप नेमका कसा करायचा, असा प्रश्न निर्माण होतो. डोळ्यांचा मेकअप केवळ तुमचे डोळे सुंदर आणि आकर्षक बनवत नाही तर तुम्हाला प्रोफेशनल लुक (Professional look) देखील देतो. मात्र, यासाठी तुम्ही योग्य प्रकारे मेकअप करणे आणि प्रसंगानुसार तयार असणे आवश्यक आहे. अनेक वेळा अशीही समस्या उद्भवते की, डोळ्यांचा मेकअप काही वेळातच फिका होऊ लागतो आणि चेहऱ्यावरही पसरतो. तुम्हीही अशा समस्यांमधून जात असाल तर आम्ही तुम्हाला डोळ्यांच्या मेकअपसाठी काही खास सोप्या स्टेप्स सांगत आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही ऑफिसला जाताना खास लूक सहज करू शकता. हा मेकअप तुम्ही कधीही करू शकता. हा डोळ्यांचा मेकअप तुम्हाला ट्रेंडी तसेच प्रोफेशनल (How To Do Simple Eye Makeup) लुक देईल. सिंपल डोळ्यांचा मेकअप कसा करायचा 1. प्रथम आय प्राइमर लावा प्रथम, तुमच्या आय लीडवर आय प्राइमर लावा. त्यामुळे तुमचा मेकअप बराच काळ टिकून राहण्यास मदत होते. आय प्राइमर मेकअपसाठी गुळगुळीत त्वचा करण्यास मदत करते. तुमच्या बोटांच्या मदतीने आय प्राइमर लावा आणि कोरडे होऊ द्या. यानंतर आय शॅडो बेस वापरा जेणेकरून तुमच्या शेड्सला चांगला बेस मिळेल. पण जर तुमच्याकडे आय शॅडो बेस नसेल तर तुम्ही फाउंडेशन किंवा कन्सीलर देखील वापरू शकता. 2. शेड्स निवडा रोजच्या कॅज्युअल लूकसाठी तुम्ही वापरू शकता अशा शेड्स निवडा. यासाठी तुम्ही लाइट टोन निवडू शकता. आता कॉम्पॅक्ट पावडर लावा आणि पुन्हा आय शॅडो लावा. यासाठी हवे असल्यास 2-3 शेड्स ब्लेंड करा. सर्वकाही अशा प्रकारे ब्लेंड करा की कुठलीही जास्त किंवा कमी लागली जाणार नाही. 3. आता आय लाइनर लावा आय लाइनर लावा आणि डोळ्यांच्या सर्व कोनांवर ते दिसतील अशा प्रकारे लावून घ्या. आता डोळ्याच्या पेन्सिलने किंवा इअर बड्सद्वारे स्मज करून नवीन लूक द्या. या दरम्यान, जर तुम्हाला काजळ लावायचे असेल तर ते देखील लावू शकता. हे वाचा -  त्वचा आणि केसांसाठी आंब्याच्या पानांचा असा होतो उपयोग, ही पद्धत जाणून घ्या 4. eyelashes कर्ल आता पापण्या कर्ल करण्यासाठी आयलॅश कर्लर वापरा आणि त्यासह पापण्यांना टच अप द्या. जर तुमच्याकडे फार कमी वेळ असेल तरी तुम्ही हे करू शकता. हे वाचा -  डिजिटल मल्टीटास्किंग मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी घातक - नवेे संधोधन शेवटचा टचअप देण्यासाठी तुम्ही शेवटी काजळ लावू शकता. यामध्ये डोळ्यांना अधिक आकार देण्यासाठी तुम्ही पुन्हा आयलायनर वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात डोळ्यांचा झटपट होणारा सिंपल पण आकर्षक मेकअप करू शकता. तुम्‍ही तुमच्‍या मीटिंग किंवा पार्टीसाठी हा आय मेकअप वापरू शकता. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात