जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Digital Multitasking: डिजिटल मल्टीटास्किंग मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी घातक - नवेे संधोधन

Digital Multitasking: डिजिटल मल्टीटास्किंग मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी घातक - नवेे संधोधन

Digital Multitasking: डिजिटल मल्टीटास्किंग मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी घातक - नवेे संधोधन

Digital Multitasking: इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मल्टीटास्किंग करणे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे एका अहवालातून समोर आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लक्झेंबर्ग आणि युनिव्हर्सिटी डी जिनिव्हच्या संशोधकांच्या टीमने 8 ते 12 वयोगटातील 118 स्विस मुला-मुलींचा अभ्यास केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 मार्च : कोरोना महामारीमुळे आपल्याकडे आता कुठे मुले शाळेत जावू लागली आहेत, मधल्या काळात त्यांचा बहुतेक वेळ व्हिडिओ गेम खेळण्यात जात असे. जो मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, आजकाल मुलं आपला जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोन, कॉम्प्युटर, टेलिव्हिजन, टॅबलेट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर घालवतात. कोरोनाच्या या युगाने केवळ मोठ्याच नाही तर लहान मुलांच्याही हातात स्मार्ट फोन दिला जात आहे. ज्यावर मुले तासन्तास (Digital Multitasking) वेळ घालवतात. याबाबत foxnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मल्टीटास्किंग करणे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे एका अहवालातून समोर आलं आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. मुलांवर सर्वेक्षण मुले त्यांचा बहुतेक वेळ दूरदर्शन, संगणक, टॅब्लेट, स्मार्टफोन आणि व्हिडिओ गेम्स यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर घालवतात. युनिव्हर्सिटी ऑफ लक्झेंबर्ग आणि युनिव्हर्सिटी डी जिनिव्हच्या संशोधकांच्या टीमने 8 ते 12 वयोगटातील 118 स्विस मुला-मुलींचा अभ्यास केला. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या त्यांच्या वापरासोबतच त्यांचे लक्ष कोणत्या गोष्टींकडे जास्त असते, याचाही शोध घेण्यात आला. यासाठी एक सर्वेक्षण पेपर तयार करण्यात आला, ज्यामध्ये मुलांच्या पालकांकडून झोप, ग्रेड आणि मानसिक आरोग्य यासारख्या गोष्टींची माहिती घेण्यात आली. हे वाचा -  बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी रचलं खोटं लग्न, भाड्याच्या नवऱ्यासोबत केलं फोटोशूट सर्वेक्षणात ही बाब समोर आली सर्वेक्षणानुसार, मुलांनी घालवलेल्या एकूण वेळेचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत नसल्याचे समोर आले. मात्र, जेव्हा मुले एकाच वेळी अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतात (मल्टीटास्किंग), जसे की मेसेज पाठवताना टीव्ही पाहणे किंवा एकावेळी दोन-दोन गॅझेट वापरणे, त्यामुळे मुलांवर जास्त ताण किंवा इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हे वाचा -  औषधांच्या पाकिटांवर का असते अशी लाल पट्टी? एक्सपायरी डेट इतकीच ती समजून घेणं आहे गरजेचं मुलांनी मुलींपेक्षा जास्त वेळ घालवला आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, मुले आठ वर्षांच्या होईपर्यंत मीडियावर दररोज सुमारे साडेचार तास मल्टीटास्किंगमध्ये घालवतात. पण जसजसा तो मोठा होत गेला तसतसा तो वयाच्या बाराव्या वर्षाचा होईपर्यंत त्याने आठ तासांपेक्षा जास्त वेळ इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर घालवले. मुलींपेक्षा मुलांनी व्हिडिओ गेम्सवर जास्त वेळ घालवल्याचेही या अहवालात समोर आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात