जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Beauty care: त्वचा आणि केसांसाठी आंब्याच्या पानांचा असा होतो उपयोग, ही पद्धत जाणून घ्या

Beauty care: त्वचा आणि केसांसाठी आंब्याच्या पानांचा असा होतो उपयोग, ही पद्धत जाणून घ्या

Beauty care: त्वचा आणि केसांसाठी आंब्याच्या पानांचा असा होतो उपयोग, ही पद्धत जाणून घ्या

Mango leaves health benefits : आंब्याची पाने त्वचा आणि केसांसाठी अनेक प्रकारे वापरता येतात. आंब्याच्या पानांचा त्वचा आणि केसांसाठी कसा उपयोग होतो हे जाणून घेऊयात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 मार्च : आंबा खायला आवडत नाही, असा व्यक्ती सापडणं मुश्कील. आंबा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आंबा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो, कारण त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. खायला अतिशय चविष्ट असलेल्या आंब्याव्यतिरिक्त, त्याची पानं (Mango leaves health benefits) देखील आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानली जातात. आंब्याच्या पानांमध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा (Mango leaves for skin) आणि केसांसाठीही फायदेशीर असतात. आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C for skin) , व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सारखी अनेक पोषक घटक असतात. याव्यतिरिक्त, त्यामध्ये स्टिरॉइड्स, अल्कलॉइड्स, रिबोफ्लेविन, थायामिन, फिनोलिक, बीटा-कॅरोटीन, फ्लेव्होनॉइड्स इत्यादी संयुगे असतात. टीव्ही 9 ने दिलेल्या बातमीनुसार, आंब्याच्या पानांची वैशिष्ट्य म्हणजे केस गळण्यापासून ते त्वचेवरील खाज, जळजळ कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. आंब्याची पाने त्वचा आणि केसांसाठी अनेक प्रकारे वापरता येतात. आंब्याच्या पानांचा त्वचा आणि केसांसाठी कसा उपयोग होतो हे जाणून घेऊयात. हे वाचा -  शेवटी उत्तर मिळालं! महिलांना पुरुषांच्या या गोष्टी अजिबात आवडत नाहीत, होतात वाद त्वचेवर होणारी जळजळ आणि कोरडेपणा आंब्याच्या पानांचे वैशिष्ट्य म्हणजे त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासोबतच त्वचेवरील जळजळ/खाज देखील कमी केली जाते. यासाठी थोडी आंब्याची पाने तुम्हाला जाळावी लागतील. आंब्याची पाने जाळल्यानंतर त्यांची राख प्रभावित भागावर लावावी. यामुळे जळजळ होण्याचा त्रास आणि कोरडेपणाही कमी होईल. ताजी पाने तुम्हाला हवा असल्यास आंब्याच्या ताज्या पानांचा फेस मास्कही बनवू शकता. यासाठी 5 ते 5 आंब्याची पाने घेऊन बारीक करून त्यात एक चमचा मध घाला. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने चेहरा सामान्य पाण्याने धुवा. असे आठवड्यातून दोनदा केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. हे वाचा -  रोजच्या या सवयींमुळे अनेकांची हाडे कमकुवत होत जातात, तुम्हीही तेच करत नाही ना? केसांसाठी आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. ते योग्य पद्धतीने लावल्यास केसांची वाढ चांगली होऊ शकते. यासाठी आंब्याची पाने बारीक करून त्याची पेस्ट डोक्याला लावा. साधारण 15 मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा. आंब्याच्या पानांशी संबंधित ही टिप्स अवलंबल्याने केसांचा रंग सुधारतो आणि ते मजबूत होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात