मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /घरातील जुन्या झालेल्या झाडूच्याबाबतीत या चुका टाळा; वास्तुशास्त्रात सांगितलेत उपाय

घरातील जुन्या झालेल्या झाडूच्याबाबतीत या चुका टाळा; वास्तुशास्त्रात सांगितलेत उपाय

घरातील झाडू जुना झाला असेल किंवा तुटला असेल तर तो लगेच घरातून काढून टाकावा. कारण, जुना झाडू घरात नकारात्मक ऊर्जा आणतो. मात्र, जुना झाडू घराबाहेर टाकण्याचेही काही नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत, जाणून घेऊ त्याविषयी

मुंबई, 18 जून : हिंदू धर्मीय मान्यतेनुसार झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आपण झाडूच्या साहाय्याने घर स्वच्छ करतो. झाडू कचऱ्यात असलेली अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून घराबाहेर टाकण्याचे काम करतो. त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. वास्तुशास्त्रात झाडू खरेदी करणे, घरात ठेवणे आणि जुन्या झाडूचे काय करावे याबाबत काही नियम सांगितले (Rules for Broom) आहेत.

ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया झाडू कुठे ठेवावा, जुन्या झाडूचे काय करावे आणि कोणत्या दिवशी घराबाहेर टाकून द्यावा.

जुन्या झाडूचे काय करावे?

जर तुमच्या घरातील झाडू जुना झाला असेल आणि तो तुटला असेल तर तो लगेच घरातून काढून टाकावा. कारण जुना झाडू घरात नकारात्मक ऊर्जा आणतो. तुटलेला झाडू वापरणे टाळा. तुटलेला खराब झालेला झाडू घरातील अडचणी वाढवण्याचे काम करतो.

जुना झाडू कोणत्या दिवशी आणि कुठे टाकावा?

घरातून जुना किंवा तुटलेला झाडू कधी टाकून द्यायचा हे तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर यासाठी सर्वात योग्य दिवस शनिवार किंवा अमावस्या मानला जातो. याशिवाय ग्रहणानंतर आणि होलिका दहनानंतर तुम्ही घरातून तुटलेला आणि जुना झाडू काढू शकता. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा झाडूसोबत बाहेर पडते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

हे वाचा - मुलांच्या मेंटल ग्रोथसाठी या टिप्स आहेत उपयोगी; लहान असल्यापासूनच होईल फायदा

झाडू कुठे फेकायचा आणि कुठे नाही?

आपल्या घरातील जुना आणि तुटलेला झाडू फेकताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्यावर कोणाचा पाय पडू शकणार नाही, अशी जागा निवडा. झाडू नाल्यात किंवा कोणत्याही झाडाजवळदेखील फेकू नका. झाडू जाळायचाही नसतो.

हे वाचा - डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा अर्थ काय? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घ्या

कोणत्या दिवशी झाडू टाकू नये?

गुरुवार, शुक्रवार आणि एकादशीला घराबाहेर झाडू टाकू नये. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात आर्थिक संकटे सुरू होतात, असे मानले जाते.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Vastu