मुंबई, 19 ऑक्टोबर : सणांचा काळ आला, की फराळाची आणि विविध पदार्थांची रेलचेल असते. करंजी, चिरोटे, शंकरपाळी असे मैद्याचे विविध पदार्थ आपण तयार करतो; पण याच काळात मैद्याचा होणारा खप पाहून नफेखोरीसाठी कित्येक दुकानदार त्यात भेसळ (Adulteration in Maida) करतात. मैदा आणि तांदळाच्या पिठात ((Adulteration in Rice floor) स्वस्त अशी बोरिक पावडर (Boric powder) टाकून भेसळ करण्यात येते. अशा वेळी तुम्ही बाजारातून आणलेले हे पदार्थ भेसळयुक्त आहेत की नाही हे ओळखण्याची एक सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बोरिक अॅसिड (Boric acid effects on body) आपल्या शरीरासाठी मोठ्या प्रमाणात घातक असते. एका अहवालातल्या माहितीनुसार, बोरिक अॅसिडमुळे पोटदुखी, ताप, मळमळ, त्वचेवर लाल चट्टे, जळजळ, पेल्व्हिक इनफ्लेमेशन आणि उच्च रक्तदाब यांसारखे विविध आजार (Boric acid effects) होण्याची शक्यता असते. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ खाणं हे आजाराला निमंत्रण देण्यासारखं आहे.
Detecting Boric acid adulteration in Maida / Rice flour.#DetectingFoodAdulterants_10#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago @mygovindia @MIB_India @PIB_India @MoHFW_INDIA pic.twitter.com/IudYjxy4Sw
— FSSAI (@fssaiindia) October 14, 2021
त्यामुळेच आपण घेतलेले पदार्थ तपासून घेणं गरजेचं आहे. यासाठी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाने (FSSAI twitter) आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत एक व्हिडिओ (FSSAI video on food safety) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेली ट्रिक तुम्हाला अगदीच फायद्याची ठरणार आहे. हे वाचा - ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाण्याचेही आहेत खूप सारे फायदे यासाठी तुम्हाला एक ग्रॅम मैदा किंवा तांदळाचं पीठ एका टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आहे. यानंतर त्यात 5 मिलिलिटर पाणी घालायचं आहे. यानंतर त्यात कॉन्सन्ट्रेटेड एचसीएलचे (Concentrated HCL) काही थेंब टाकायचे आहेत. या मिश्रणामध्ये थोडासा टर्मरिक पेपर (Turmeric paper) बुडवायचा आहे. तुम्ही घेतलेला मैदा शुद्ध असेल, तर टर्मरिक पेपरचा रंग आहे तसाच राहील; पण टर्मरिक पेपरचा रंग लाल झाला, तर त्यात भेसळ असल्याचं स्पष्ट होईल. हे वाचा - प्रदूषणापासून होणारा धोका टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश हवाच सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांमुळे सगळ्या रंगाचा बेरंग होऊन जातो. त्यातून औषध-रुग्णालयाचा खर्च करावा लागतो तो वेगळाच. सध्या कोरोनामुळे आपण ज्याप्रमाणे इतर गोष्टींबाबत खबरदारी बाळगत आहोत, त्याप्रमाणेच खाद्यपदार्थांच्या बाबतीतही अशी खबरदारी बाळगून, एकदम आरोग्यदायी पद्धतीने सण साजरे करू शकतो. यासाठीच FSSAI आपल्या ट्विटर हँडलवरून बरीच महत्त्वपूर्ण माहिती शेअर करत असते. यासोबतच विविध हेल्दी रेसिपीजही या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात येत असतात.

)







