मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाण्याचेही आहेत खूप सारे फायदे

ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाण्याचेही आहेत खूप सारे फायदे

शिळी चपातीचे खाण्याचे काय काय फायदे आहेत पाहा.

शिळी चपातीचे खाण्याचे काय काय फायदे आहेत पाहा.

शिळी चपातीचे खाण्याचे काय काय फायदे आहेत पाहा.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर :  नेहमी ताजं अन्न खावं, शिळं खाल्ल्याने आरोग्य बिघडतं असं सांगितलं जातं. त्यामुळे बहुतेक जण शिळं अन्न फेकून देतात. अनेकांना उरलेले अन्न सकाळी डस्टबिनमध्ये फेकण्याची वाईट सवय असते. हे अन्न खराब होत नसलं तरी लोक ते निष्काळजीपणे डस्टबिनमध्ये टाकतात. पण तुम्हाला माहिती आहे का काही पदार्थ विशेषत: चपाती शिळी असल्यास त्याचे आरोग्याला खूप फायदे होतात. ताज्या चपातीपेक्षा शिळी चपाती अधिक पौष्टिक असते. कारण शिळ्या चपातीमध्ये आरोग्यास उपयुक्त जीवाणू वाढतात. त्यामुळं त्याचा आरोग्यास फायदा होऊ शकतो. मात्र अशी चपाती 12 ते 16 तासांपेक्षा जास्त काळ शिळी राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आज आपण शिल्लक राहिलेली चपाती किंवा शिळी चपाती (basi roti health benefits) खाण्याचे फायदे जाणून घेऊयात, जे कदाचित तुम्हाला याआधी माहीत नसतील. हे वाचा - Explainer : खाद्यतेल आयातीवरील सीमाशुल्क कपातीचा सरकारचा निर्णय; किमतीवर होणार परिणाम? मधुमेही (diabetic) रुग्णांसाठी फायदा - डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शिळ्या रोटी (basi roti) मधुमेही रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. रोज सकाळी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने तुमच्या शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. तसेच जळजळ होण्याच्या समस्येपासून शरीराला आराम मिळतो. उच्च रक्तदाब नियंत्रण - शिळ्या चपाती खाणे रक्तदाबाच्या रुग्णांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. सकाळी थंड दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने उच्च रक्तदाब सहज नियंत्रित करता येतो. हे वाचा - Sardar Udham Singh: विकी-कतरिना आणि कियारा-सिद्धार्थ पोहोचले ‘सरदार उधम सिंह’च्या स्क्रिनिंगला; फारच उत्सुक दिसले कलाकार अ‌ॅसिडीटीपासून आराम - पोटाच्या समस्या, अ‌ॅसिडीटी आणि बद्धकोष्ठतेने ग्रस्त लोकांनाही शिळ्या चपातीपासून आराम मिळू शकतो. सकाळी दुधासोबत चपाती खाल्ल्याने तुम्ही आंबटपणा आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासातून मुक्त होऊ शकता. जिममध्ये जाणाऱ्यांसाठी फायदेशीर - खूप कमी लोकांना हे माहीत असेल की जिम जाणाऱ्यांसाठीही शिळी चपाती फायदेशीर आहे. जिममध्ये पिळदार शरीरयष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शिळ्या चपातीचे अनेक फायदे आहेत. तुम्ही जाणकार जिम ट्रेनरला त्याच्या फायद्यांविषयी विचारू शकता.
First published:

Tags: Food, Health Tips

पुढील बातम्या