मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /प्रदूषणापासून होणारा धोका टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश हवाच; फुफ्फुसे राहतील निरोगी

प्रदूषणापासून होणारा धोका टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश हवाच; फुफ्फुसे राहतील निरोगी

कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करून त्यांना अधिकच कमजोर बनवतो. प्रदूषणामुळे ज्यांची फुफ्फुसे आधीच खराब झाली आहेत, त्यांच्या अडचणी खूपच वाढल्या आहेत. अशा स्थितीत तुमची फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेऊया.

कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करून त्यांना अधिकच कमजोर बनवतो. प्रदूषणामुळे ज्यांची फुफ्फुसे आधीच खराब झाली आहेत, त्यांच्या अडचणी खूपच वाढल्या आहेत. अशा स्थितीत तुमची फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेऊया.

कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करून त्यांना अधिकच कमजोर बनवतो. प्रदूषणामुळे ज्यांची फुफ्फुसे आधीच खराब झाली आहेत, त्यांच्या अडचणी खूपच वाढल्या आहेत. अशा स्थितीत तुमची फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : वाढत्या प्रदूषणामुळे (Pollution) लोकांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. दुसरीकडे, कोरोनाचा कहर आजही थांबायचं नाव घेत नाहीये. सध्या कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे, परंतु दररोज हजारो लोक अजूनही या संसर्गामुळे संक्रमित होत आहेत. कोरोनामुळं दोन्ही फुफ्फुसांना हानी पोहचू शकते. प्रदूषित हवेमुळं लोकांच्या फुफ्फुसांवर आधीच वाईट परिणाम होत आहे आणि दुसरीकडे कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करून त्यांना अधिकच कमजोर बनवतो. प्रदूषणामुळे ज्यांची फुफ्फुसे आधीच खराब झाली आहेत, त्यांच्या अडचणी खूपच वाढल्या आहेत. अशा स्थितीत तुमची फुफ्फुसे मजबूत होण्यासाठी आणि प्रदूषणापासून होणारा धोका टाळण्यासाठी तुमच्या आहारात काही (Foods Prevent Pollution) विशिष्ट गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे.

संत्री खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. त्यात असे अँटीऑक्सिडेंट घटक असतात, जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. ज्यांना अनेकदा हंगामी आजारांना सामोरे जावं लागतं त्यांनी रोज आपल्या आहारात संत्र्याचा समावेश करावा.

हिरव्या भाज्यांपासून पोषक घटक

दररोज हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यानं जीवनसत्त्वे आणि प्रथिनांसारखी अनेक पोषक तत्वे मिळतात. शरीराची प्रतिकारशक्ती बळकट करण्याबरोबरच प्रदूषणापासून संरक्षण करण्यासही मदत होते.

आलं खावं

आलं अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. त्याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासह, हे प्रदूषणापासून संरक्षण करण्यास देखील मदत करते. अद्रकाचा काढा किंवा ते चहामध्ये घालून प्यायल्यानं कफची समस्याही दूर होते.

हे वाचा - अजबच! …अन् वेडिंग ड्रेस घालून लग्न मंडपात पोहोचली नवरीची आई; उडाला एकच गोंधळ

गुळ निरोगी बनवते

गुळ खाल्ल्याने शरीराचे तापमान सामान्य राहते. त्यातून पुरेसे लोह मिळत असल्याने रक्तात ऑक्सिजन व्यवस्थित तयार होतो. प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी हे उपयुक्त आहे. हिवाळ्याच्या काळात फुफ्फुसांमध्ये कफ जमा होतो. हा कफ दूर करण्यासाठी गुळ हे उत्तम औषध आहे. ते चहामध्ये घालून पिणे अधिक फायदेशीर आहे.

आवळा व्हिटॅमिन सीने समृद्ध

आवळा व्हिटॅमिन सी चा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे मुक्त रॅडिकल्स नष्ट करण्यात मदत करतात. व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते. तसेच प्रदूषणाच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. जर तुम्ही त्याचे नियमित सेवन केले तर अनेक आजार टाळता येतील.

हे वाचा - केवळ 500 रुपयांत खरेदी करता येईल सोनं, Gold मध्ये करा गुंतवणूक; मिळेल जबरदस्त रिटर्न

काळी मिरी कफ बरे करण्यास उपयुक्त

काळी मिरीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. ते एका डिकोक्शनमध्ये किंवा चहामध्ये टाकून, ते प्यायल्याने फुफ्फुसांमध्ये जमा झालेला कफ काढून टाकला जातो. काळी मिरीचा प्रभाव गरम असतो, त्यामुळे त्याचे सेवन सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम देते. जर तुम्ही रोज काळी मिरी पावडर आणि मध वापरत असाल तर ते प्रदूषण टाळण्यास देखील मदत करेल.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Food, Health Tips, Pollution