जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नीट पचन न होणं अनेक गंभीर आजारांचं कारण बनतं; खाण्या-पिण्यातील या चुका ताबडतोब बदला

नीट पचन न होणं अनेक गंभीर आजारांचं कारण बनतं; खाण्या-पिण्यातील या चुका ताबडतोब बदला

नीट पचन न होणं अनेक गंभीर आजारांचं कारण बनतं; खाण्या-पिण्यातील या चुका ताबडतोब बदला

Tips to Improve Digestion: अन्न नीट पचलं नाही तर ते आतड्यांमध्ये जास्त काळ राहतं, पोट साफ होत नाही. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. हे सर्व प्रकार नंतर अनेक गंभीर आजारांना जन्म देऊ शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : आपण जे काही खात असतो त्याचं नीट पचन (indigestion) होणं खूप गरजेचं असतं. नंतर पोट फुगणे, मळमळ, अपचन, पोटात जळजळ, गॅसची समस्या वाढू शकते. निरोगी आरोग्यासाठी पचनक्रिया व्यवस्थित राहणं खूप महत्त्वाचं असतं. अन्न नीट पचलं नाही तर ते आतड्यांमध्ये जास्त काळ राहतं, पोट साफ होत नाही. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. हे सर्व प्रकार नंतर अनेक आजारांना जन्म देऊ शकतात. त्यामुळं आपली पचनसंस्था (Digestive system) नीट काम करणं खूप गरजेचं आहे. यासाठी काही प्रभावी टिप्स वापरून पहा (How to boost Digestive health). पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. पाचक प्रणाली मजबूत करण्याचे उपाय (Tips to Improve Digestion) काही वेळा आहारात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी कमी पडलं तरीही पचनशक्ती कमकुवत होऊ शकते. व्हिटॅमिन सी साठी आपण लिंबू, संत्री, किवी, स्ट्रॉबेरी यासारखी लिंबूवर्गीय फळे खाऊ शकतो. पोटाचे आरोग्य सुधारण्यासोबतच व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थं खाणं गरजेचं असते, त्यानं रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. आपण दररोज जे काही खातो ते नीट चावून खा. अन्न तोंडात किमान 15 ते 20 वेळा चघळलं गेलं पाहिजे आणि नंतरच ते पोटात घ्यावे. अन्न जास्त प्रमाणात चघळल्याने लाळ एंझाइम्स उत्तेजित होतात, ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. आपण पुरेसे पाणी पित नसेल तरीही पचन नीट होत नाही. यासाठी आपण दररोज 2-3 लीटर पाणी प्यायला हवं. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते. सकाळी उठल्यानंतर 1-2 ग्लास कोमट पाणी प्या, पचनशक्ती मजबूत होईल. जेवढे पाणी प्याल तेवढे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणी प्यायल्या लघवी वाटे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. हे वाचा -  jaggery and gram benefits: मूठभर चणे आणि गूळ नियमित खा; आजारी पडणं विसरून जाल फायबर युक्त गोष्टींचा आहारात शक्यतो समावेश करा. भरपूर धान्य, फळे, भाज्या खा. फायबर तुमच्या पचनमार्गात पाणी शोषून घेते, ज्यामुळे मल मोकळा होतो आणि आतड्यांमधून बाहेर जाणं सोपं होतं. दररोज 20-30 मिनिटे व्यायाम केल्याने पचनसंस्था मजबूत होते. तुम्ही पोटाचे काही व्यायाम करायला सुरुवात करा. याशिवाय दररोज चालणे, जॉग करणे, यामुळे मलप्रवाह बरोबर होतो, अन्न लवकर पचते, बद्धकोष्ठतेची समस्या नाहीशी होते. हे वाचा -  तेल लावताना या चुका टाळायला हव्यात; केसांच्या अनेक समस्या नंतर सुरू होतात जर तुम्हाला बाथरूमला जावं लागत असेल, परंतु तुम्ही तुमच्या कामामुळे ते पुढे ढकलत असाल तर तसं चुकूनही करू नका. याचा पचनशक्ती आणि आतड्यांवर विपरीत परिणाम होतो. जीवनशैलीत असे काही छोटे-छोटे बदल करून आपण पचनसंस्था निरोगी ठेवू शकतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात