नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : आपल्या मनातील आत्मविश्वास कोणत्याही व्यक्तीला नवीन उंचीवर घेऊन जातो. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल किंवा तुम्हाला प्रत्येक काम अधिक चांगल्या पद्धतीने करायचे असेल तर तुमचा स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. तुमच्या सवयींमध्ये काही चांगले बदल करा. तसं पाहायला गेलं तर महिला या बहु-टास्कर्स (मल्टीटास्कर्स) आहेत आणि त्या एकाच वेळी अनेक कार्ये सहजपणे हाताळू शकतात. पण तरीही त्यांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी थोडासा प्रयत्न केला तर लोकही त्यांच्या बोलण्याकडे अधिक लक्ष देतील आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुमचा दर्जा, तुमची ओळख टिकवून ठेवू शकाल. जर तुम्हाला एखाद्या अधिकारी महिलेप्रमाणे आत्मविश्वासपूर्ण दिसायचे असेल, तर तुमच्या लाईफमध्ये खालील काही सवयींचा अवश्य समावेश करा. स्वतःकडे लक्ष - सर्वात अगोदर स्वतःकडे लक्ष द्या. आजपासूनच शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि नैतिक आधारावर स्वतःची काळजी घेणे सुरू करा. स्वार्थी असणं आणि स्वतःची काळजी घेणं यात भरपूर मोठा फरक आहे. पोश्चर महत्त्वाचा - पाठीचा कणा नेहमी सरळ ठेवा आणि मान ताठ ठेवा. अनेक मुलींमध्ये उगीच मुलगी आहे म्हणून खाली मान घालून चालण्या-बोलण्याची सवय असते. ती पूर्ण चुकीची आहे. मान ताठ ठेवा यामुळे तुमचा आंतरिक आत्मविश्वास वाढेल. जर तुमचा पाठीचा कण झुकलेला किंवा मान खाली घालणं या गोष्टी तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता दर्शवतात. खडखडीत/ स्पष्ट बोला - मुलींनी मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही आरशासमोर उभे राहून वेगवेगळ्या पद्धतीने बोलण्याचा सराव करू शकता. लक्षात घ्या की, मोठ्यानं बोलणं म्हणजे आरडाओरडा करणं असा त्याचा अर्थ नाही. तुमचं म्हणणं ठामपणे, स्पष्ट शब्दात मांडा. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा - स्वतःला आव्हान द्या आणि तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्ही नवीन गोष्टी शिकाल आणि गोष्टी हाताळताना नवीन आव्हानांना सामोरे जाल. तुमची ही पद्धत तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप पुढे नेईल. हे वाचा - रक्त पिऊन त्रास देणाऱ्या उवांचं मूळ अमेरिकेत; दर वर्षी 1.20 कोटी जणांना भेडसावते इतरांशी तुलना नको, स्वत:शीच स्पर्धा ठेवा- इतरांच्या नजरेतून स्वतःला जज करू नका. स्वत:शी स्वत:ची तुलना करायला शिकलेले बरे. उदाहरणार्थ, तुम्ही कामामध्ये, अभ्यासात किंवा तुमच्या क्षेत्रातील कामात पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने वागत आहात की नाही किंवा तुमची बोलण्याची पद्धत पूर्वीपेक्षा चांगली आहे का इ. हे वाचा - भारतीय पुरुषांसाठी धोक्याची घंटा; स्पर्म काउंट होतोय वेगाने कमी जुन्या चुकांना घाबरू नका - चुका कोणाकडूनही होऊ शकतात, त्यामुळे आपल्या जुन्या चुकांमुळे घाबरून जाण्यापेक्षा किंवा लाज वाटण्यापेक्षा स्वतःवर हसणं चांगलं. तणावग्रस्त राहण्याऐवजी तुम्ही हसा. या टिप्स वापरल्यास तुमच्यात अधिक आत्मविश्वास येईल आणि तुम्हाला मनातून अधिक चांगलं वाटेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.