जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लो-ग्लाइसेमिक इंडेक्स आहार हार्ट पेशंटचं वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर - स्टडी

लो-ग्लाइसेमिक इंडेक्स आहार हार्ट पेशंटचं वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर - स्टडी

लो-ग्लाइसेमिक इंडेक्स आहार हार्ट पेशंटचं वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर - स्टडी

हाय-ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच हाय-जीआय आहारामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. यामध्ये पांढरे ब्रेड, भात, बटाटे आणि मिठाई यांचा समावेश आहे. उच्च जीआय आहारामुळे हृदयरोग आणि टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. तर लो-जीआय आहार उशिरा पचतो, ज्यामुळे साखरेची पातळी देखील हळूहळू वाढते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 मे : युरोपियन सोसायटी ऑफ कार्डियोलॉजीच्या ACNAP-EuroHeartCare Congress-2022 मध्ये सादर केलेल्या अभ्यासा त, असा दावा करण्यात आला आहे की, कमी ग्लायसेमिक इंडेक्स (कमी GI) आहार (low glycemic index) हृदय विकाराच्या रुग्णांना वजन कमी करण्यास मदत करतो. रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याच्या क्षमतेवर आधारित चरबीयुक्त पदार्थांची क्रमवारी लावणारी GI ही प्रणाली आहे. उच्च जीआय आहारामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. यामध्ये पांढरा ब्रेड, भात, बटाटे आणि मिठाई यांचा समावेश आहे. कमी GI आहार उशिरा पचतो, ज्यामुळे साखरेची पातळी देखील हळूहळू वाढते. यामध्ये सफरचंद, संत्री, ब्रोकोली, बीन्स आणि ब्राऊन राइस आणि ओट्स इत्यादींचा समावेश आहे. मांस आणि मासे इत्यादींचे जीआय रँकिंग केले गेले नाही, कारण त्यात कर्बोदके नसतात. पूर्वीच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, उच्च जीआय आहारामुळे हृदयरोग आणि टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. अभ्यास कसा झाला? अलीकडील अभ्यास असे सूचित करतात की कमी GI आहार बॉडी मास इंडेक्स (BMI) संतुलन राखण्यात मदत करतो. 2016 ते 2019 पर्यंत चाललेल्या या अभ्यासात 38 ते 76 वर्षे वयोगटातील 160 रुग्णांचा समावेश होता. यादरम्यान एका गटाला सामान्य ठेवण्यात आले, तर दुसऱ्या गटाला तीन महिने कमी जीआय आहारावर ठेवण्यात आले. यानंतर, दोन्ही गटातील लोकांचे बीएमआय आणि शरीर रचना मोजली गेली, ज्यामध्ये कमी जीआय आहार घेणार्‍या गटामध्ये मोठा सकारात्मक बदल दिसून आला. हे वाचा -  असे देश जिथे सेक्स वर्कर्स सरकारला देतात Tax, महिलांना मिळतात हे लाभ तज्ज्ञ काय म्हणतात - या अभ्यासाचे लेखक आणि रिपब्लिकन स्पेशलाइज्ड सायंटिफिक प्रॅक्टिकल मेडिकल सेंटर ऑफ थेरपी अ‌ॅण्ड मेडिकल रिहॅबिलिटेशन, ताश्कंद, उझबेकिस्तानचे डॉ. जामोल उझोकोव्ह (Dr. Jamol Uzokov) यांच्या मते, “या अभ्यासाच्या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी अजून मोठ्या अभ्यासाची आवश्यकता आहे. आमचा अभ्यास असे दर्शवितो की, संतुलित आहाराचा भाग म्हणून कमी-जीआय खाद्यपदार्थांवर जोर दिल्यास हृदयविकाराच्या रुग्णांना त्यांचे शरीराचे वजन आणि कंबरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते."

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात