Home /News /lifestyle /

रोजच्या आहारात किती असावं नेमकं साखरेचं प्रमाण, वाचा सविस्तर; नक्की होईल फायदा

रोजच्या आहारात किती असावं नेमकं साखरेचं प्रमाण, वाचा सविस्तर; नक्की होईल फायदा

आहारातलं साखरेचं प्रमाण नक्की किती असावं, याची नेमकी कल्पना सर्वांना असतेच असं नाही.

नवी दिल्ली, 17 जानेवारी: नवीन वर्ष सुरू होताच अनेक जण वजन कमी करण्याचा (Weight Control) संकल्प करतात. मग त्यासाठी केला जाणारा पहिला उपाय म्हणजे साखरेच्या सेवनावर मर्यादा आणणं. चहा बिनसाखरेचा घेणं किंवा गोड पदार्थ खाणं टाळणं, असे उपाय अनेक जण करतात. कारण अनेकांना वाटतं, की जेवणातली साखर कमी केली म्हणजे वजन आटोक्यात आलंच म्हणून समजा; पण आहारातलं साखरेचं प्रमाण नक्की किती असावं, याची नेमकी कल्पना सर्वांना असतेच असं नाही. साखरेच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबतची माहिती 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिली आहे. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात साखरेच्या सेवनावर गदा येते. तुम्हाला माहीत आहे का, की तुम्ही खरंच एक महिना काही गोड खाल्लं नाही, तर त्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतील? जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation) एका अहवालानुसार महिलांनी कमी साखर खायला हवी; पण पुरुषांच्या बाबतीत मात्र असं नाहीये. पुरुषांसाठी प्रत्येक दिवसाचं साखर सेवनाचं प्रमाण महिलांपेक्षा जास्त चालू शकतं. या अहवालानुसार महिलांसाठी दिवसाला जास्तीत जास्त साखर सेवनाचं प्रमाण 25 ग्रॅम आहे, तर पुरुषांसाठी हेच प्रमाण 30 ग्रॅम आहे.

Covid Testing Kit: कोविड सेल्फ-टेस्टिंग किट्स खरंच किती विश्वसनीय आहे? डॉक्टरांनी सांगितले त्याविषयी

आपण नेहमीच साखरेच्या सेवनाचे दुष्परिणाम ऐकत असतो. अनेकदा डॉक्टरांकडूनही साखरेच्या सेवनावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिला जातो. बरेच जणांचा हा समज असतो, की ज्यांना मधुमेह (Diabetes) आहे, त्याच व्यक्तींनी साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. हे फक्त मधुमेहाच्या बाबतीतच नाही, तर इतर अनेक आजारांच्या बाबतीतही लागू होतं. कारण आहारात जास्त प्रमाणात साखर असल्यास आधी वजन वाढतं. मग पोटाचा घेर वाढतो आणि मग मधुमेह व इतर आजारांचा शिरकाव शरीरात होऊ लागतो. याचा अर्थ हा नक्कीच नाही, की तुम्ही गोड खाणंच सोडून दिलं पाहिजे. जसं साखर जास्त प्रमाणात सेवनाचे दुष्परिणाम आहेत. तसंच शरीराला गोड न मिळाल्यासही अपाय होऊ शकतो. त्यामुळे साखरेचं सेवन न केल्यास त्याऐवजी आहारात नैसर्गिकरीत्या गोड असलेल्या घटकांचा (Natural Sweeteners) समावेश केला पाहिजे. विविध फळांचा आणि सुक्या मेव्याचा समावेश रोजच्या आहारात करणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या ग्लुकोजची पूर्तता होईल. ते आपल्या शरीरातल्या स्नायूंसाठी आवश्यक आहे.

Vastu Tips: मुलांचे अभ्यासात लागत नाही मन; वास्तुशास्त्रानुसार त्यांच्या खोलीत लावा ही रोपं, दिसेल परिणाम

फळं आणि नैसर्गिकरीत्या साखरेची पूर्तता करणाऱ्या घटकांचा आहारात समावेश करा. तुम्हाला एका महिन्यातच या बदलाचे चांगले परिणाम शरीरावर दिसू लागतील. तुम्हाला तुमचं शरीर आधीपेक्षा जास्त हलकं आणि नेहमीपेक्षा जास्त ऊर्जावान वाटू लागेल. साखरेच्या कमी सेवनामुळे थकवाही कमी प्रमाणात येतो. लक्षात घ्या, हा बदल करणं सगळ्यांनाच शक्य होईलच असं नाही. त्यामुळे डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन मगच आपल्या आहारात बदल करा.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Lifestyle, Sugar

पुढील बातम्या