नवी दिल्ली, 17 जानेवारी : कोविडची तिसरी लाट दुसऱ्यापेक्षाही वेगानं पसरल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोविड-सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन न केल्यामुळं रुग्णसंख्येत वेगानं वाढ नोंदवली जात आहेत. सध्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारामुळं चिंतेचं वातावरण आहे. तसंच कोविडच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळं देशभरात स्व-परीक्षण किटची (सेल्फ-टेस्टिंग किट्स - Self Testing Kits) मागणी वाढली आहे. बाजारात या किटची किंमत 250 ते 350 रुपयांपर्यंत आहे. ही किट्स हेल्थकेअर तंत्रज्ञांद्वारे केल्या जाणाऱ्या RT-PCR (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन-पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन) चाचण्यांच्या कमी-जास्त होणाऱ्या दरांसाठी स्वस्त पर्याय आहेत. EconomicTimes च्या बातमीनुसार, कमी खर्चाव्यतिरिक्त, रॅपिड अँटीजन टेस्ट (RAT) किटमुळं घरातल्या घरात लोकांना कोरोना चाचणी सहजपणे करता येते. परंतु, त्यांचे निकाल किती अचूक असतात किंवा होम टेस्ट किट्स किती विश्वासार्ह आहेत, हे तुम्हाला (Self Testing Kits For Covid-19) माहिती आहे का?
खरं तर, बहुतेक रॅपिड अँटीजन चाचण्या नाकाद्वारे स्वॅब वापरून केल्या जातात आणि त्याचे निकाल फक्त 15 मिनिटांत समोर येतात. होम टेस्ट RAT किट वापरणं अत्यंत सोयीचं आहे. फोर्टिस हॉस्पिटल, शालीमार बाग येथील पल्मोनोलॉजी विभागप्रमुख आणि संचालन डॉ. विकास मौर्य म्हणतात की, विषाणूच्या गुणसूत्र चाचणीपेक्षा RAT किट कमी विश्वासार्ह आहेत आणि या किटनं दिलेले पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निकाल चुकीचेही असण्याची शक्यता असते. असे चुकीचे निकाल येणं अत्यंत गंभीर आहे.
SRL डायग्नोस्टिक्सचे सीईओ आनंद के म्हणतात की, RAT चुकीचा निगेटिव्ह निकाल देते, तेव्हा रुग्णांना सुरक्षिततेची खोटी भावना होते. जेव्हा लोक सावधगिरी म्हणून चाचणी करणार असतील तेव्हाच होम किटची शिफारस केली जाते. डॉ. नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सचे संसर्गजन्य रोगांसंबंधीचे सल्लागार लक्ष्मण जेसानी म्हणतात की, 25 ते 30 टक्के प्रकरणांमध्ये स्वयं-चाचणी चुकीचे निगेटिव्ह परिणाम दर्शवते. नकारात्मक परिणामाचा अर्थ असा होतो की, चाचणीमध्ये विषाणू आढळला नाही किंवा तुम्हाला तो संसर्ग झाला नसावा. परंतु, तरीही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे वाचा -
Vastu Tips: मुलांचे अभ्यासात लागत नाही मन; वास्तुशास्त्रानुसार त्यांच्या खोलीत लावा ही रोपं, दिसेल परिणाम
जसलोक हॉस्पिटलच्या जेरियाट्रिक्स विभागाचे सल्लागार डॉ. नागनाथ नरसिंहन प्रेम म्हणतात की, RAT हे एक चांगले होम किट आहे. परंतु, त्याची अचूकता हा अजूनही वादाचा विषय आहे. RT-PCR च्या तुलनेत कोविड स्व-चाचणी अचूकतेमध्ये थोडीशी कमी पडते. कारण त्यात चुकीचे निगेटिव्ह निकाल येण्याची शक्यता जास्त असते.
हे वाचा -
Low Blood Pressure Symptoms: बीपी लो झाल्याची ही 7 लक्षणं वेळीच ओळखा; आहारातील हा बदल ठरेल गुणकारी
RT-PCR ला COVID चाचणीसाठी 'गोल्ड स्टँडर्ड' का म्हटलं जातं?
आरटी-पीसीआर चाचणी नमुन्यातील रिबोन्यूक्लिक अॅसिड (आरएनए) आनुवांशिक गुणसूत्रांचा (Genetics) अभ्यास करते आणि अधिक अचूक परिणाम देण्यासाठी विषाणूचे अनुवांशिक घटक शोधते. बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटल मिलर्स रोड येथील सल्लागार पल्मोनोलॉजिस्ट आणि चेस्ट फिजिशियन डॉ. वसुनेत्रा कासारगोड म्हणतात की, आरटी-पीसीआर हे कोविड चाचणीमध्ये सुवर्ण मानक मानलं जातं. कारण, ती लक्षणं नसलेल्या व्यक्तींमध्ये वापरलं जाऊ शकते (ज्यांना कोविडची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत) आणि संसर्गाचे निदान देखील करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.