जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Vastu Tips: मुलांचे अभ्यासात लागत नाही मन; वास्तुशास्त्रानुसार त्यांच्या खोलीत लावा ही रोपं, दिसेल परिणाम

Vastu Tips: मुलांचे अभ्यासात लागत नाही मन; वास्तुशास्त्रानुसार त्यांच्या खोलीत लावा ही रोपं, दिसेल परिणाम

Vastu Tips: मुलांचे अभ्यासात लागत नाही मन; वास्तुशास्त्रानुसार त्यांच्या खोलीत लावा ही रोपं, दिसेल परिणाम

Vastu Tips: याविषयी मुलांचे पालकही चिंतेत असतात. मुलांचे मन अभ्यासात गुंतावे आणि त्यांची एकाग्रता भंग होऊ नये म्हणून ते वेगवेगळ्या पद्धती वापरतात. वास्तुशास्त्रातहीयाविषयी काही पद्धती सांगितल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जानेवारी : अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही मुलांचे अभ्यासात (Children study tips) मन लागत नाही. त्यामुळे मुले अभ्यासात चांगली कामगिरी करू शकत नाहीत. त्यामुळे मुलांचे पालकही चिंतेत असतात. मुलांचे मन अभ्यासात गुंतावे आणि त्यांची एकाग्रता भंग होऊ नये म्हणून ते वेगवेगळ्या पद्धती वापरतात. वास्तुशास्त्रातही (Vastu Tips) याविषयी काही पद्धती सांगितल्या आहेत. वास्तूशास्त्रानुसार मुलांच्या अभ्यासाच्या खोलीची दिशा आणि मुलांच्या वाचनाची स्थितीही खूप महत्त्वाची असते. शिवाय काही वनस्पती असतात, ज्या मुलांच्या अभ्यास कक्षात लावल्याने त्यांचे अभ्यासात चांगले मन लागते. खोलीत ही रोपे लावल्याने ऑक्सिजनचा प्रवाह चांगला होतो आणि वातावरणातही सकारात्मकता येऊ लागते. जाणून घेऊया वास्तूनुसार मुलांचे अभ्यासात मन लागण्यासाठी त्यांच्या खोलीत कोणती झाडे ठेवावीत. बांबू रोप फेंगशुई वास्तूमध्ये बांबू वनस्पती अतिशय शुभ मानली जाते. असे म्हणतात की मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत बांबूचे रोप लावल्याने मुलांची एकाग्रता होऊन त्यांचे मन अभ्यासात रमू लागते. हे वाचा -  लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात चमेली मुलांचे मन अभ्यासात गुंतून राहावे म्हणून अभ्यासाच्या खोलीत चमेलीचे रोप लावू शकता. वास्तूनुसार स्टडी रूममध्ये चमेलीचे रोप ठेवल्याने तणाव कमी होतो. यासोबतच मनाला शांती मिळते आणि मुलांचे मन अभ्यासात गुंतू लागते. पीस लिली मुलांच्या अभ्यासाच्या खोलीतही पीस लिलीचे रोप लावता येते. हे रोप खोलीत लावल्याने वातावरण स्वच्छ राहते. तसेच खोलीत हे रोप लावल्याने मुले आनंदी होतात आणि त्यांचे मनही अभ्यासाला लागते. हे वाचा -  Vastu Tips: भाग्य चमकण्यात तुमच्या चप्पलचाही असतो महत्त्वाचा रोल; जाणून घ्या त्यामागचं सूत्र ऑर्किड मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ऑर्किडच्या रोपालाही स्थान देता येईल. त्याची फुले तर अतिशय आकर्षक तर असतातच पण खोलीत ऑर्किडचे रोप लावल्याने खोलीत सकारात्मक ऊर्जा राहते. खोलीत हे रोप लावल्याने मुलांचे मन अभ्यासात गुंतू लागते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात