नवी दिल्ली, 04 जुलै : दुधाला संतुलित आहार म्हणून ओळखले जाते. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे लहानपणापासूनच दूध पिण्यावर भर दिला जातो. कॅल्शियमची कमतरता दुधाने पूर्ण होते आणि आपली हाडे मजबूत होतात यात शंकाच नाही. पण मधुमेही रुग्णांसाठी दूध पिणे कितपत सुरक्षित आहे? हा मोठा प्रश्न आहे. वेबएमडी मध्ये प्रकाशित झालेल्या आरोग्यविषयक लेखानुसार, दुधामध्ये कार्बोहायड्रेट्स देखील असतात आणि कार्बोहायड्रेट्स शुगर लेव्हल वाढवू शकतात. आईस्क्रीम, दही किंवा चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्यापूर्वी त्यांच्या प्रमाणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण त्या सर्वांमध्ये कर्बोदके असतात आणि प्रत्येक जेवणानंतर साखर तपासणे देखील महत्त्वाचे (Milk In Diabetes) आहे. मधुमेह समजून घ्या - टाइप 1 मधुमेहामध्ये स्वादुपिंड कमी किंवा इन्सुलिन तयारच करत नाही. हा एक प्रकारचा ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे, जो मुख्यतः बालपणात सुरू होतो. प्रौढांमध्ये टाइप 1 मधुमेहाची केवळ 5.2% शक्यता असते. ती कमी करता येते, पण थांबवता येत नाही. टाईप 1 मधुमेहामध्ये कार्बोहायड्रेट सेवन (साखर, स्टार्च आणि फायबर) चा प्रभाव कमी करण्यासाठी, प्रत्येक जेवणानंतर इन्सुलिनचे इंजेक्शन्स घ्यावे लागते. तर टाइप 2 मधुमेहामध्ये स्वादुपिंड पूर्णपणे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीर त्याचा पूर्णपणे वापर करू शकत नाही. त्यामुळे लठ्ठपणा वाढू लागतो. कौटुंबिक इतिहासात मधुमेह आहे किंवा कौटुंबिक इतिहासात गर्भावस्थेचा मधुमेह आहे, वयस्कर लोक, शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय असलेले किंवा कमी ग्लुकोज चयापचय होत आहे, अशा लोकांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त असतो. दूध त्रासदायक ठरू शकते - दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ हे अनेक लोकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. कारण ते कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. परंतु, त्यामध्ये चरबी आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असू शकते. जे मधुमेही रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. एक कप दुधात 150 कॅलरीज, 6 ते 7 ग्रॅम फॅट आणि 12 ग्रॅम कर्बोदके असतात, तर कमी चरबीयुक्त दुधात 120 ते 122 कॅलरीज, 10 ते 12 ग्रॅम फॅट, 11 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. फॅट फ्री एक कप दुधात 84 कॅलरीज, 1 ग्रॅमपेक्षा कमी फॅट आणि 10 ते 12 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. जास्त चरबीयुक्त आहार आणि मधुमेहामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढू शकतो. तुमच्या आहारातील चरबीचे प्रमाण नियंत्रित करून हा धोका कमी केला जाऊ शकतो. परंतु, केवळ अस्वास्थ्यकर चरबीचे पदार्थ आहारातून कमी करावे लागतील, कारण चांगली चरबी आरोग्यासाठी आवश्यक आहेत. साधारणपणे दुधात आढळणारे फॅट्स हे आरोग्यासाठी हानिकारक असतात. दुधात असलेले कार्बोहायड्रेट्स रक्तात बिघाड झाल्यानंतर साखरेत रुपांतरित होतात. अशा परिस्थितीत दुधाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर वाढू शकते. हे वाचा - ग्रीन टी उपयोगी असली तरी कितीवेळा पिणं आहे फायदेशीर; दुष्परिणाम पण समजून घ्या स्वतःची काळजी कशी घ्यावी मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही दूध पिऊ शकता. पण, दूध किती प्रमाणात योग्य आहे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. फॅट फ्री दूध पिऊ शकतो. दुधातून जास्त कार्ब्स शरीरात जाऊ शकणार नाही याची काळजी घ्यावी. एकावेळी थोडेसे दूध प्यायल्याने त्याचा रक्तातील साखरेवर होणारा परिणाम तपासता येतो. हे वाचा - हर्नियाचे ऑपरेशन झाल्यानंतर या चुका अनेकजण करतात; नंतर त्रास वाढत जातात दुधाला इतर पर्याय - मधुमेही रुग्णांसाठी दुधाला अनेक पर्याय आहेत, जे ते त्यांच्या आवडीनुसार निवडू शकतात. त्यापैकी एक म्हणजे बदामाचे दूध, नारळाचे दूध, शेळीचे दूध, ओट्स, अक्रोड. शेंगदाणे आणि तांदूळ इ. महत्त्वाचे म्हणजे आपण कोणतेही दूध पित असलो तरी त्यातील साखरेच्या प्रमाणाची माहिती घ्यायला हवी. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.