मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /खसखस खाल्ल्यानं वजन कमी होतं का? त्यातील पोषक घटक आणि फायदे जाणून घ्या

खसखस खाल्ल्यानं वजन कमी होतं का? त्यातील पोषक घटक आणि फायदे जाणून घ्या

Weight loss tips: भारतात सर्वसाधारणपणे पांढरी खसखस जास्त वापरली जाते, ज्याला भारतीय खसखस​ म्हणतात. या छोट्या खसखस​बियांमध्ये अनेक प्रकारचे पोषक असतात, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Weight loss tips: भारतात सर्वसाधारणपणे पांढरी खसखस जास्त वापरली जाते, ज्याला भारतीय खसखस​ म्हणतात. या छोट्या खसखस​बियांमध्ये अनेक प्रकारचे पोषक असतात, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Weight loss tips: भारतात सर्वसाधारणपणे पांढरी खसखस जास्त वापरली जाते, ज्याला भारतीय खसखस​ म्हणतात. या छोट्या खसखस​बियांमध्ये अनेक प्रकारचे पोषक असतात, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

नवी दिल्ली, 09 मे : वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी खसखसचा उपयोग केलाय का? नसेल तर त्याचा आहारात नक्की समावेश करा. पॉपी सीड्स किंवा खसखस ही​जगभरात विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. खसखसची महत्त्वाचे दोन प्रकार आहेत, निळी आणि पांढरी. भारतात सर्वसाधारणपणे पांढरी खसखस जास्त वापरली जाते, ज्याला भारतीय खसखस​ म्हणतात. या छोट्या खसखस​बियांमध्ये अनेक प्रकारचे पोषक असतात, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. वजन वाढीचा त्रास असलेल्यांनी खसखस नक्की खावी. खसखसमध्ये असलेले पोषक तत्व आणि त्याचे फायदे जाणून (Khus Khus Benefits) घेऊया.

खसखस मधील घटक -

प्रथिने, फायबर, ऊर्जा, कर्बोदके, लोह, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन बी-6, ओमेगा-6 फॅटी अ‌ॅसिडस्, मॅग्नेशियम, प्रथिने यांसारखे पोषक तत्व खसखसमध्ये असतात. हृदय, पचनसंस्था, केस, त्वचा, निद्रानाश, मधुमेह, हाडे आणि न्यूरोलॉजिकल समस्यांसह अनेक रोगांमध्ये ती प्रभावी आहे.

खसखसचे आरोग्य फायदे -

खसखस वजन कमी राखते -

बीबॉडीवाइजमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, खसखसमध्ये असलेले झिंक थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत ठेवते. त्याचबरोबर यामध्ये असलेले मँगनीज मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी खसखस हा एक चांगला पर्याय आहे. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी खसखसचे नक्की खा.

महिलांची प्रजनन क्षमता वाढवते -

महिलांमध्ये प्रजनन क्षमतेशी संबंधित काही समस्या असल्यास आहारात खसखसचा समावेश करा. हे फॅलोपियन ट्यूबमधून श्लेष्मा काढून टाकते. महिलांची प्रजनन क्षमता वाढते.

हाडांचे आरोग्य सुधारते -

खसखसमध्ये कॅल्शियम आणि तांबे खूप जास्त असतात. जर तुमची हाडे कमकुवत असतील, वेदना होत असतील तर खसखस खाण्याचा सल्ला दिला जातो. खसखस हाडे मजबूत करतात. यामध्ये असलेले मँगनीज प्रोटीन कोलेजन तयार होण्यास मदत करते. यामुळे हाडांचे गंभीर नुकसान टाळता येते.

हे वाचा - मे महिन्यात जन्मलेल्या लोकांची असतात खास वैशिष्ट्ये; फक्त रागावर नियंत्रण ठेवा

त्वचा आणि केस निरोगी राहतात -

खसखसमध्ये दाहक-विरोधी घटक असतात, जे त्वचेशी संबंधित समस्या एक्जिमा कमी करतात. त्वचेवर खाज येत असेल तर खसखस बारीक करून पावडर बनवा. त्यात लिंबाचा रस घालून पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. केसांमधला कोंडा दूर करण्यासाठीही याचा वापर करता येतो. खसखस, व्हाईट पेपर, दही मिक्स करून पेस्ट बनवा. ते डोक्याच्या त्वचेवर लावा. तासभरानंतर कोमट पाण्याने केस धुवा.

हे वाचा - सकाळी होणाऱ्या एवढ्याशा चुकीमुळं अ‌ॅसिडिटी सगळा दिवस खराब करते; लवकर बदला सवय

प्रतिकारशक्ती वाढवते -

खसखसमध्ये बायोएक्टिव्ह घटक आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. अनेक प्रकारच्या संसर्गापासून शरीराचे रक्षण होते. मजबूत अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्मांसह, झिंकमुळे ताप, सर्दी, घसा खवखवणे आणि इतर श्वसन संक्रमण रोखण्यासाठी यातील झिंक अत्यंत प्रभावी आहे. पचन सुधारण्यासाठीही फायदा होतो, खसखस आहारातील फायबरमध्ये भरपूर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.

First published:

Tags: Weight, Weight loss tips