मुंबई, 29 जून : आजकालच्या व्यग्र जीवनशैलीत स्वतःला तंदुरुस्त ठेवणे हे मोठे आव्हान आहे. लोकांची बिघडलेली दिनचर्या त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. अनेकदा आपण ऐकले असेल की स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आपल्याला रोज चालावे लागते. उत्तम आरोग्यासाठी दररोज किती किलोमीटर चालावे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. अनेकांना कदाचित हे माहीत नाही, की दररोज चालण्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. निरोगी राहण्यासाठी दिवसात किती किलोमीटर चालणे आवश्यक आहे, याबाबत जाणून (Health Benefits of Walking) घेऊया. दररोज किती चालतात मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, फिट राहण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दररोज सुमारे 10,000 पावले चालणे आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हे अंतर सुमारे 8 किलोमीटर होते. आपण क्षमतेनुसार हे अंतर आणखी वाढवू शकता. चालणे हा एक प्रकारचा व्यायाम आहे, शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यास त्यामुळे मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वजन कमी करण्यासाठी चालणे खूप प्रभावी आहे. चालण्याचे अनेक प्रकार आहेत, परंतु आपल्याला नॉर्मल चालण्याचाही खूप फायदा होतो. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार जाणून घेऊया रोज चालण्याचे फायदे - आर्थरायटिस फाऊंडेशनने चालण्याच्या फायद्यांचा रिपोर्ट प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, दररोज चालण्याने स्नायू मजबूत होतात, रक्त प्रवाह सुधारतो, लवचिकता वाढते. याशिवाय चालण्याने वृद्धांमध्ये सांधे जडपणा, लठ्ठपणा, ऑस्टिओपोरोसिस आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी होतो. 2020 च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक दररोज 8,000 पावले चालतात त्यांना 4,000 पावले चालणाऱ्यांपेक्षा कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा धोका 51 टक्के कमी आहे. दररोज 12,000 पावले चालणाऱ्या लोकांमध्ये धोका आणखी कमी होता. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम या गोष्टी लक्षात ठेवा काही अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की, सपाट पृष्ठभागावर चालण्यापेक्षा उंचीवर चढल्याने स्नायूंना 3 पट अधिक फायदा होतो. डोंगराळ भागात राहणार्या लोकांसाठी, 10,000 पावले चढणे हार्ड व्यायाम प्रकार मानला जातो. जर तुम्ही मैदानी प्रदेशात राहत असाल तर तुम्ही अधिक फायद्यासाठी पायऱ्या चढू शकता. मात्र, आपण कोणत्याही आजाराने ग्रस्त असल्यास आपण चालण्याचे हे प्रकार करण्यापूर्वी एखाद्या वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.