Home /News /lifestyle /

धक्कादायक! विचित्र आजाराने ग्रस्त लेकाने रागात तोडली आईची बोटं

धक्कादायक! विचित्र आजाराने ग्रस्त लेकाने रागात तोडली आईची बोटं

इतका राग येतो की तो सर्वांना मारहाण करतो.

इतका राग येतो की तो सर्वांना मारहाण करतो.

त्याच्या आजारामुळे त्याचा रागावर कंट्रोल राहत नाही.

    ब्रिटन, 11 ऑगस्ट : राग (Anger) हा प्रत्येकामध्ये असतो. काहींना तो कमी प्रमाणात येतो (Angry person) तर काहींना जास्त प्रमाणात. काहींना आपल्या रागावर कंट्रोल ठेवता येतो तर काहींना आपला राग बिलकुल आवरत नाही. पण फार फार तर अति राग म्हणजे किती असावा? चक्क लेकाने आपल्या आईची बोटं तोडण्याइतपत राग? (Son broke mothers fingers) हा इतका राग कसा काय? तर हा मुलगा एका विचित्र आजारामुळे (Rare disease) ग्रस्त आहे. ज्यामुळे त्याला इतका राग येतो. असे बरेच आजार आहे, ते दुर्मिळ (Rare Syndrome) आणि विचित्र आहेत. म्हणजे असे आजारही असू शकतात, यावर आपल्याला विश्वास बसत नाही. अशाच आजाराशी झुंज देणारा 18 वर्षांचा कॅमेरून लिंडसे (Cameron Lindsay). ज्याने रागात चक्क आपल्या आईची बोटं तोडली आहे. कॅमेरून ला 2013 पासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्याला पांडास सिंड्रोम (PANDAS Syndrome) आहे. सुरुवातीला कॅमेरूनच्या मेंदूत इन्फेक्शन झालं. ते पसरल्यानंतर त्याला पांडास सिंड्रोम झालं. हा सिंड्रोम असलेल्यांना अचानक राग येतो. ते खूप रागिष्ट असतात आणि त्यांना एंझायटीही समस्या होते. हे वाचा - सावधान!कोरोनाच्या आडून हा आजार कधी वाढला कळालंच नाही; 5 राज्यांमध्ये जास्त रुग्ण कॅमेरूनला इतका राग यायचा की तो आपल्या कुटुंबासमोर चाकू काढून त्यांना घाबरवायचा. त्यांना हानी पोहोचवयाच. कॅमेरूनला भास व्हायचे. कॅमेरूनची आई नताशा सांगते, या आजारामुळे कॅमेरून असा वागतो, जणू काय त्याच्यावर भूतच चढलं आहे. त्याची काळजी घेणं खूप कठीण होतं. 2014 साली त्याचा हा आजार अधिकच वाढला. तो घरच्यांना मारहाणही करू लागला. कॅमेरूनची स्थिती पाहतात त्याला प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. यानंतर हळूहळू त्याचा आजार जणू गायबच झाला. 2018 पर्यंत औषधं आणि प्लाझ्मा थेरेपीमुळे कॅमेरूनची प्रकृती खूपच सुधारली होती. पण सिंड्रोममुळे त्याच्या मेंदूच्या कार्यात बिघाड झाला होता. तो बोलणं विसरला होता. त्याला पुन्हा सर्वकाही शिकावं लागलं. हे वाचा - अरे बापरे! पाणी समजून झोपेत घटाघट प्यायला मेण; तरुणाची झाली भयंकर अवस्था हळूहळू कॅमेरूनची प्रकृती ठिक होऊ लागली, पांडासचा परिणाम आता त्याच्यावर कमी दिसतो आहे. पण त्याचे मूड स्विंग अद्यापही भयंकर आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये त्याला घरात बंदिस्त करून ठेवण्यात खूप अडचण झाली. पण तो स्वतःला सांभाळतो आहे, असं कॅमेरूनची आई नताशाने सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Mental health, Rare disease

    पुढील बातम्या