मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Coronavirus: मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर Zydus Cadila's Virafin हे औषध कसं काम करतं?

Coronavirus: मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर Zydus Cadila's Virafin हे औषध कसं काम करतं?

Zydus Cadila या भारतीय औषध कंपनीच्या व्हिराफिन (Virafin) नावाच्या अँटी-व्हायरल औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. कोविड-19 चा (Covid19) मध्यम स्वरूपाचा आजार झालेल्यांवर उपचारांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे.

Zydus Cadila या भारतीय औषध कंपनीच्या व्हिराफिन (Virafin) नावाच्या अँटी-व्हायरल औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. कोविड-19 चा (Covid19) मध्यम स्वरूपाचा आजार झालेल्यांवर उपचारांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे.

Zydus Cadila या भारतीय औषध कंपनीच्या व्हिराफिन (Virafin) नावाच्या अँटी-व्हायरल औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. कोविड-19 चा (Covid19) मध्यम स्वरूपाचा आजार झालेल्यांवर उपचारांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 25 एप्रिल: शुक्रवारी (23एप्रिल) भारताच्या औषध महानियंत्रकांनी (Drug Controller General of India - DCGI) झायडस कॅडिला (Zydus Cadila) या भारतीय औषध कंपनीच्या व्हिराफिन (Virafin) नावाच्या अँटी-व्हायरल औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली. कोविड-19 चा (Covid19) मध्यम स्वरूपाचा आजार झालेल्यांवर उपचारांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे. पेगायलेटेड इंटरफेरॉन अल्फा टू बी (Pegylated Interferon alpha-2b) असं नाव असलेल्या या औषधाचं ट्रेड नेम व्हिराफिन (Virafin) असं आहे.

    इंटरफेरॉन्स (Interferon) ही आपल्या शरीरातली संदेश देणारी प्रोटीन्स (Signalling Proteins) असून, ती इम्युनॉलॉजिकल एजंट्स (Immunological Agents) म्हणजेच प्रतिकारयंत्रणेचे घटक म्हणून काम करतात.

    झायडसकॅडिला (Zydus Cadila) या कंपनीने हे स्पष्ट केलं आहे, की व्हिराफिन हे औषध मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवरच उपचारांसाठी वापरता येणार आहे. जेव्हा व्हायरल लोड म्हणजेच संसर्गाचं प्रमाण मध्यम ते तीव्र असतं, तेव्हा ऑक्सिजनची गरजही वेगाने वाढते. हे औषध दिल्यानंतर व्हायरल लोड (Viral Load) कमी होईल आणि ऑक्सिजनची गरजही कमी होईल.

    या औषधाचा एक डोस दिल्यानंतर कोविड-19 चा मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या बहुतांश रुग्णांचा व्हायरल लोड सात दिवसांत शून्यावर आला, असं चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आढळल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला, की हे औषध व्हायरल लोड कमी करण्याचं काम वेगाने करू शकेल. याच आधारे या कंपनीला डीसीजीआयकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

    (वाचा - रिक्षावाल्याचा मोठेपणा, कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरू केली फ्री ऑटो सर्विस!)

    हिपॅटायटिससी (Hepatitis C) या अन्य विषाणूजन्य आजाराच्या उपचारांसाठी हे औषध आधीच वापरलं जात आहे. 2004 मध्ये जेव्हा सार्सचा (SARS) म्हणजेच कोरोना विषाणूच्या पहिल्या व्हॅरिएंटचा फैलाव झाला होता, तेव्हा करण्यात आलेल्या अभ्यासात असं स्पष्ट झालं होतं, की हे औषध सार्सवरील उपचारांसाठीही प्रभावी आहे. त्यामुळे ते आता कोविड-19 च्या उपचारांसाठीही वापरलं जात आहे.

    या औषधाला केवळ आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली असल्याने ते केवळ मर्यादित वापरासाठी उपलब्ध असेल. तसंच, केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच ते मिळेल आणि डॉक्टरांच्या पर्यवेक्षणाखालीच त्याचा रुग्णावर वापर करता येणार आहे. त्यामुळे त्याचा गैरवापर टाळण्यासाठी हे औषध कोविड-19 च्या सरसकट सगळ्या रुग्णांसाठी मेडिकलमध्ये मिळणार नाही. प्रिस्क्रिप्शन असेल, तरच मिळू शकेल.

    अँटीव्हायरल (Antiviral Drug) अर्थात विषाणूरोधक असलेल्या कोणत्याही औषधाचे साइड-इफेक्ट्स (Side Effects)असतातच. त्यामुळे व्हिराफिन या औषधाचेही साइड-इफेक्ट्स आहेत. हे औषध घेतल्यानंतर काही रुग्णांना एन्फ्लुएंझासारखी लक्षणं दिसू शकतात. काही रुग्णांच्या रक्ताच्या घटकांमध्ये (Blood Composition) बदल होण्याचा धोका असतो, तर काही जणांना न्यूरो-सायकिअॅट्रिक डिस्टर्बन्सेस (neuro-psychiatric disturbances) म्हणजेच मानसिक अस्वस्थता, तसंच मज्जासंस्थेशी निगडित क्रियांमध्ये काही अडथळे जाणवू शकतात. त्यामुळे हे औषध केवळ डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच वापरायचं आहे.

    (वाचा - कोरोना लशीचे दोन्ही डोस घ्यायलाच हवेत का? पाहा काय म्हणाले AIIMS चे डॉक्टर)

    आतापर्यंत कोविड-19 चे दुष्परिणाम कमी करण्यासाठी अनेक औषधं उपलब्ध करण्यात आली आहेत. उदा. रेमडेसिवीर (Remdesivir) हे औषध कोविडच्या रुग्णांमध्ये वापरलं जात आहे. तसंच फॅबिफ्लूचाही (Fabiflu)वापर होत आहे. ही औषधंही अँटी-व्हायरल आहेत. या औषधांचा वापर केल्यानंतर कोविड-19 च्या रुग्णांमध्ये चांगल्या सुधारणा दिसल्या आहेत. अर्थात, कोविडवर पूर्णपणे उपयुक्त ठरेल असं औषध आतापर्यंत आपल्याला मिळालेलं नाही.

    त्यामुळे सध्याची परिस्थिती आणि झायडसकॅडिला कंपनीचा दावा पाहता, व्हिराफिन हे औषध कोविड-19 ची तीव्रता कमी करण्यास, तसंच मृत्युदर (Mortality Rate) कमी करण्यास उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे.

    First published:

    Tags: Coronavirus, Health, Immun, Medicine, Wellness