लहान मुलांना ज्युस देताना काळजी घ्या, 'या' वयापर्यंत ज्युस बिलकुल देऊ नका
ज्युस (Juice) आरोग्यासाठी चांगलं, मात्र लहान मुलांना ज्युस देताना पालकांनी जरा जपूनच द्यावा.
|
1/ 7
अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या मते, 12 महिने म्हणजे एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ज्युस अजिबात देऊ नये. कारण याचा त्यांना काहीच फायदा होत नाही.
2/ 7
एक वर्षानंतर मुलांना हळूहळू ज्युस देणं सुरू करावं. मात्र रेडिमेड ज्युस देऊ नये, तर घरच्या घरी फळांचा ज्युस तयार करून द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
3/ 7
दिवसाला 60 से 120 मि.लीपेक्षा जास्त ज्युस देऊ नये.
4/ 7
एफडीएच्या मते, मुलांना ज्युस उकळून देऊ नका, यामुळे त्यातील चांगल्या बॅक्टेरियांचा नाश होतो.
5/ 7
लहान आहेत म्हणून मुलांना दुधाप्रमाणे बॉटलमधून ज्युस देऊ नका. तुम्ही त्यांना चमच्याने ज्युस पाजा किंवा कपातून ज्युस द्या.
6/ 7
फळांपेक्षा भाज्यांचा रस द्या कारण फळं गोड असतात.
7/ 7
रात्री झोपण्यापूर्वी मुलांना फ्रुट ज्युस बिलकुल देऊ नका. यामुळे पोट फुगणं, गॅस, अपचन अशा समस्या उद्भवू शकतात.