टोरंटो, 12 ऑगस्ट : आधी पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर डाय (Hair dye) केलं जायचं पण आता हेअर कलर (Hair Colouring) म्हणजे फॅशन झाली आहे. त्यामुळे किती तरी तरुण-तरुणी आपले केस रंगवून घेतात. असंच हेअर कलर एका तरुणीने केला पण तिची एक छोटीशी चूक तिला चांगलीच महागात पडली.
कॅनडाच्या (Canada) ओंटॅरिओत राहणारी (Ontario) 23 वर्षांची शेलिन गर्टली (Shaylene Gartly). आपण अधिक सुंदर दिसावं म्हणून तिने केसांना कलर करून घेण्याचा विचार केला. ती हेअर कलर करण्यासाठी सलूनमध्ये गेली (Hair Colour at Salon). पण सुंदर दिसण्याच्या नादात आपल्यासोबत असं काही तरी होईल, असा विचार तिने स्वप्नातही केला नसेल. सलूननंतर तिला रुग्णालयाच गाठावं लागलं.
हेअर डाय केल्यानंतर ती खूपच आनंदात होती. ती घरी पोहोचल्यानंतर काही तासांनी तिच्या डोक्यात खाज येऊ लागली. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तर तिचा चेहरा फुग्यासारखा फुगला होता. तिच्या चेहऱ्यावर सूज आली होती. डोक्यापासून मानेपर्यंत सूज होती. तिचा एक डोळा तर पूर्णपणे बंदच झाला होता. तिचा चेहराच विचित्र दिसू लागला. एखाद्या एलिअनसारखीच ती दिसू लागली.
हे वाचा - काही चुका टाळल्या तरच येईल Facial Glow; ब्युटी पार्लरमध्ये जाण्याआधी वाचाच
आपली ही अवस्था पाहून तिने रुग्णालयात धाव घेतली. डोक्यात इतक्या वेदना होत होत्या की आठवडाभर तिला आपल्या डोक्यावर आइस पॅक ठेवावा लागला, असं तिने सांगितलं. रुग्णालयात जाताच जे सुंदर केस तिने कलर करून घेतले ते तिचे केस कापावे लागले, जेणेकरून ती लवकरात लवकर बरी व्हावी.
शेलेनच्या अशा अवस्थेला जबाबदार म्हणजे तिची एक छोटीशी चूक. शेलेनला जे हेअरडाई लावण्यात आलं त्यात PPD (paraphenylenediamine) हे केमिकल होतं आणि याची अॅलर्जी तिला होती. हेअर डायची रिअॅक्शन इतकी झाली की तिचा चेहरा ओळखणंही कठीण झालं. तिचा हेअरडाय करणाऱ्या तिच्या हेअरड्रेसरने तिला आवश्यक ती काळजी न घेतल्यास ही प्रक्रिया जीवघेणी ठरू शकते, असं सांगितलं पण सलूनमध्ये तिची पॅच टेस्ट झाली नाही.
हे वाचा - भयंकर! इथं भेंडीसारखी कापून सुकवली जातात महिलांची बोटं कारण...
शेलेनने सांगितलं की सलूनमध्ये तिला पॅच टेस्टबाबत सांगितलं नाही. जर तिने पॅच टेस्ट केली असतील तर तिची अशी अवस्था झाली नसती. आपली अवस्था झाली ती इतरांची होऊ नये, म्हणून शेलेनने सोशल मीडियावर सर्वांना सावध केलं. त्यामुळे जी चूक शेलेनने केली ती तुम्ही करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Health, Lifestyle, Woman hair