इंडोनेशिया, 11 ऑगस्ट : भेंडीसारखी (Ladyfinger) लांब अशी उपमा महिलांच्या बोटांना (Finger) दिली जाते. पण एका ठिकाणी तर फक्त हीच भेंडीसारखी लांब बोटं भेंडीसारखीच कापलीही (Woman finger) जातात. ही भयंकर आणि क्रूर अशी शोकप्रथा आहे. ज्यामुळे मृताच्या आत्म्याला शांती मिळते, असं मानलं जातं (Woman finger cut).
जन्मापासून मृत्यूनंतर प्रत्येक देश, धर्म, जाती, समाज यांच्या वेगवेळ्या प्रथा परंपरा, असतात. मुंडण, काळे कपडे घालणे अशा शोक प्रथा तुम्हाला माहिती असतील. पण इंंडोनेशियातील दानी आदिवासी समाजातील ही भंयकर अशी शोक प्रथा आहे.
पापुआ गिनी बेटावर (Indonesia Papua Guinea Island) दानी आदिवासी (Dani Tribe) समाज राहतो. इथल्या बहुतेक महिलांना बोटंच नाहीत. कारण त्यांची बोटं कापलेली आहेत.
हे वाचा - Yuck! चिनी लोक चक्क लघवीत उकडतात अंडी; आवडीने खातात Virgin egg डिश
कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला की कुटुंबातील महिलांच्या दोन्ही हाताची काही बोटं कापली जातात. बोटं कापण्याआधी महिलांची बोटं दोरीने बांधली जातात जेणेकरून तिथला रक्तप्रवाह थांबेल. त्यानंतर कुऱ्हाडीने बोटं कापली जातात. बोटांचे तुकडे सुकवले जाताता आणि त्यानंतर ते जाळून त्यांची राख एका विशिष्ट ठिकाणी ठेवली जाता.
हे वाचा - हा गाडीवाला रोज तयार करतो ‘खुनी ज्यूस’! 'भयंकर हेल्दी' ज्यूसचा VIDEO होतोय VIRAL
द गार्डनच्या रिपोर्टनुसार यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते असं मानलं जातं. या भयंकर प्रथेवर आता पापुआ गिनीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण तरी समाजातील काही वयस्कर महिलांमध्ये हे दिसून येतं. ज्या महिलांची बोटं अशी कापलेली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ladyfinger, World news