मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हे Lip महिलेचे नाहीत तर...; या ओठात दडलेला 'राज' समजला तर थक्कच व्हाल

हे Lip महिलेचे नाहीत तर...; या ओठात दडलेला 'राज' समजला तर थक्कच व्हाल

फोटो सौजन्य - NaturelsWeird

फोटो सौजन्य - NaturelsWeird

हे लालचुटुक ओठ पाहून तुम्ही आकर्षित झाला असाल पण...

मुंबई, 13 सप्टेंबर : आपण बऱ्याच वेळा पाहतो, की सेल्फी घेताना कित्येक मुली आपल्या ओठांचा चंबू करतात (Flower like lip). अशा वेळी ओठांचा जो आकार होतो, त्याला इंग्रजीत पाउट (Flower that looks like pout) म्हणतात. सोबतच्या फोटोमध्येही तुम्ही असेच पाउट करणारे ओठ पाहिले असतील. मात्र हे कोणा मुलीचे ओठ नाहीत तर ते चक्क एका झाडाचं फूल (Hot lips flower) आहे. हे लालचुटुक ओठ पाहून कोणीही या फुलाकडे आकर्षित होईल.

सायकोट्रिया (Psychotria flower) असं या फुलाचं नाव. यालाच सामान्य भाषेमध्ये ‘हॉट लिप्स प्लांट’ (Hot lips plant) किंवा ‘हुकर लिप्स’ (Hot lips flower) असं म्हणतात. या फुलझाडांची उंची अगदीच कमी असते. याच्या पानांचा रंग गडद हिरवा असतो. फुलांच्या पाकळ्या एखाद्या मुलीच्या लिपस्टिक लावलेल्या ओठांप्रमाणे (Flower that looks like lips) दिसतात. या पाकळ्या फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या असतात. यामुळेच ‘व्हॅलेंटाइन डे’ला या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

हे वाचा - सुमारे चार हजार पायऱ्यांचा ‘स्वर्गात’ जाणारा जिना; आता सरकार करणार नष्ट, पण का?

अर्थात, केवळ आकर्षण म्हणूनच नाही, तर या झाडाचे इतरही फायदे (Psychotria flower usages) आहेत. या झाडामध्ये डायमिथाइल ट्रिप्टामाइन हे रसायन असतं. त्याचा वापर गाठी, वंध्यत्व आणि नपुंसकता यावरील उपचारांमध्ये केला जातो. कित्येक जण याचा वापर इतर आजारांवर उपचारासाठी पारंपारिक औषध (Psychotria flower uses) म्हणूनही करतात.

कुठे आढळतं हे फूल?

हे फूल उष्णकटिबंधीय भागामध्ये आढळतं. जगभरात अशा अगदी कमी जागा आहेत, जिथे हे फूल आढळून येतं. हे झाड मध्य आणि दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबिया, इक्वेडोर, कोस्टा रिका आणि पनामा यांसारख्या भागांमध्ये आढळून येते.

उष्णकटिबंधीय प्रांतांमध्ये आढळून येणारी ही झाडं कृत्रिमपणे लावणं, वाढवणं हे अतिशय कष्टाचं आणि अवघड काम आहे. ठराविक प्रमाणात पाणी, सूर्यप्रकाश आणि जमिनीतून मिळणारं पोषण या सर्व गोष्टींवर याची वाढ निश्चित होत असते.

हे वाचा - अलिशान बेडरूम, शाही भोजन आणि स्विमिंग पूल; दोस्तम यांच्या महालात तालिबानींची ऐश

रिपोर्टनुसार या फुलांच्या साधारणपणे दोन हजारांहून अधिक प्रजाती आढळतात. दुर्दैवाने, मोठ्या प्रमाणात होत असलेली जंगलतोड (Deforestation) आणि पर्यावरण बदलामुळे ही प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  सध्या जंगलतोड, वणवे, वैश्विक तापमानवाढ अशा बऱ्याच कारणांमुळे या फुलझाडांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्यामुळे या फुलझाडांच्या बचावासाठी काम करणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Lifestyle