मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » अलिशान बेडरूम, शाही भोजन आणि स्विमिंग पूल; दोस्तम यांच्या महालात तालिबानींची ऐश, पाहा PHOTOs

अलिशान बेडरूम, शाही भोजन आणि स्विमिंग पूल; दोस्तम यांच्या महालात तालिबानींची ऐश, पाहा PHOTOs

अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी उपराष्ट्रपती (Ex. vice president) आणि वॉरलॉर्ड म्हणून ओखळले जाणारे अब्दुल राशिद दोस्तम (Abdul Rashid Dostam) हे सध्या अफगाणिस्तान सोडून गेले आहेत. काही वर्षं ते वैद्यकीय उपचारांसाठी टर्कीत राहत होते. त्यानंतर अफगाणिस्तानात परत आलेल्या दोस्तम यांनी तालिबानच्या तावडीतून अफगाणिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर तालिबाननं काबुलमध्ये सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अलिशान हवेलीवर सध्या तालिबानचा ताबा आहे.