मराठी बातम्या /बातम्या /विदेश /सुमारे चार हजार पायऱ्यांचा ‘स्वर्गात’ जाणारा जिना; आता सरकार करणार नष्ट, काय आहे कारण?

सुमारे चार हजार पायऱ्यांचा ‘स्वर्गात’ जाणारा जिना; आता सरकार करणार नष्ट, काय आहे कारण?

स्वर्गात जाण्याची शिडी (Stairway to heaven) कुठे मिळेल याचा शोध सगळेच घेत असतात. ही शिडी अजूनपर्यंत कोणाला सापडली नाही असं वाटत असेल, तर थोडं थांबा.

स्वर्गात जाण्याची शिडी (Stairway to heaven) कुठे मिळेल याचा शोध सगळेच घेत असतात. ही शिडी अजूनपर्यंत कोणाला सापडली नाही असं वाटत असेल, तर थोडं थांबा.

स्वर्गात जाण्याची शिडी (Stairway to heaven) कुठे मिळेल याचा शोध सगळेच घेत असतात. ही शिडी अजूनपर्यंत कोणाला सापडली नाही असं वाटत असेल, तर थोडं थांबा.

  स्वर्गात जाण्याची शिडी (Stairway to heaven) कुठे मिळेल याचा शोध सगळेच घेत असतात. ही शिडी अजूनपर्यंत कोणाला सापडली नाही असं वाटत असेल, तर थोडं थांबा. हवाईच्या होनोलुलूमध्ये (Honolulu) हा स्वर्गात जाण्याची अनुभूती देणारा जिना आहे; पण हवाई सरकार (Hawaii govt) आता हा जिना पाडण्याच्या तयारीत आहे. दर वर्षी हजारो पर्यटक ज्या स्थळाला भेट देतात, ते प्रसिद्ध पर्यटनस्थळ नष्ट करण्याचा विचार सरकार का करत असेल? 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

  ‘स्टेअरवे टू हेवन’ किंवा ‘हायकू स्टेअर्स’ (Haiku Stairs) म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जिन्याची निर्मिती दुसऱ्या महायुद्धामध्ये (Second World War) करण्यात आली होती. अमेरिकेच्या नौदलाने आपल्या एका गुप्त रेडिओ तळापर्यंत पोहोचण्यासाठी 1940 मध्ये हा मार्ग तयार केला होता. पुढे 1987 मध्ये तटरक्षक दलाने सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग बंद (Haiku Stairs closed) केला होता; पण तरीही या ठिकाणाला भेट देण्यासाठी दिवसभरात शेकडो पर्यटक येतच होते.

  या पायऱ्यांवर जाणं बेकायदेशीर (Haiku Stairs illegal) आहे. तरीही वर्षभरात सुमारे चार हजार पर्यटक या ठिकाणी येतातच. या पायऱ्यांवर गेल्यास तब्बल 1000 डॉलर्सचा दंड (Haiku stairs fine) आकारला जातो; मात्र तरीही कित्येक हौशी ट्रेकर्स इथं जातातच. या जिन्याला एकूण 3,922 पायऱ्या (How many stairs are there in Stairway to heaven) आहेत. याची एकूण उंची 2,480 फूट आहे. हवाई बेटांवरच्या ओहू शहरातल्या कुलाऊ पर्वतरांगेमध्ये हा जिना आहे. या जिन्याच्या उंचीमुळे, वर चढलेल्या व्यक्तीला ढगही खाली दिसतात. त्यामुळेच लोकांना स्वर्गात आल्याची अनुभूती होते. यामुळेच या पायऱ्यांना स्टेअरवे टू हेवन म्हणतात.

  हे ही वाचा-Shocking! स्मशानातील सांगाड्यासह नाचताना दिसली नन; भयावह दृश्य पाहून लोक सुन्न

  'एपी'ने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी मार्च महिन्यामध्ये होनोलुलू पोलिसांनी (Honolulu police) या जिन्यावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा ट्रेकर्सना अटक केली होती. यासोबतच अशाच एका कारवाईदरम्यान पोलिसांनी 93 जणांना नोटिसा दिल्या होत्या. एवढी सगळी सुरक्षा बाळगल्यामुळे आतापर्यंत या ठिकाणी केवळ एकाच व्यक्तीचा मृत्यू (Honolulu haiku stairs death) झाल्याची नोंद आहे. 2012 मध्ये गायक आणि कॉमेडियन फ्रिट्ज हसनपुश यांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता.

  'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, होनोलुलूचे अधिकारी हा जिना नष्ट करण्याची योजना आखत आहेत. ही एक अत्यंत धोकादायक टूरिस्ट साइट असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. होनोलुलू प्रशासनाने हा ‘स्टेअरवे टू हेवन’ हटवण्यासाठी गेल्या बुधवारीच (8 सप्टेंबर) एकमताने निर्णय घेतला होता.

  First published: