Home /News /lifestyle /

Coronavirus : साबण की सॅनिटायझर, व्हायरसपासून बचावासाठी काय वापरणं योग्य?

Coronavirus : साबण की सॅनिटायझर, व्हायरसपासून बचावासाठी काय वापरणं योग्य?

तज्ज्ञांच्या मते, हँड सॅनिटायझरपेक्षा (Hand sanitizer) साबण (soap) वापरणं जास्त सुरक्षित आहे.

    मुंबई, 23 एप्रिल : कोरोनाव्हायरसवर (coronavirus) अद्याप औषध, लस उपलब्ध झालेली नाही. यापासून बचावाचा एक मार्ग म्हणजे हात स्वच्छ धुणं. व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सातत्याने हात धुवावेत असा सल्ला दिला जातो आहे. मात्र हात स्वच्छ ठेवण्यासाठी साबण आणि सॅनिटायझर यामध्ये काय परिणामकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, हँड सॅनिटायझरपेक्षा (Hand sanitizer) साबण (soap) वापरणं जास्त सुरक्षित आहे. नॅशव्हिलेतील व्हँडरबिल्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनचे (Vanderbilt University School of Medicine in Nashville) डॉ. विल्यम शॅफ्नर यांनी सांगितलं, "व्हायरसचा नाश करण्यासाठी सॅनिटायझरमध्ये 60 टक्के अल्कोहोल असायला हवं. शिवाय सॅनिटायझरचे काही थेंब हातावर घेऊन वरवर हात चोळणं पुरेसं नाही. सॅनिटायझर हातावर नीट पसरायला हवं. पूर्ण हात आणि बोटांच्या मध्येही ते लागायला हवं" एमोरी युनिव्हर्सिटीतील (Emory University) बिल वुएस्ट म्हणाले, "अल्कोहोल हा वेगळा रासायनिक घटक आहे, जर्म्सवर तो हल्ला करतो मात्र त्यासाठी अल्कोहोल थेट या बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या संपर्कात यायला हवेत" हे वाचा - सॅनिटायझर वापरण्याआधी हे वाचा! अपघातानंतर डॉक्टरांनी दिला सल्ला मात्र अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर काळजीपूर्वक वापरलं नाही, तर जिवावर बेतू शकतं, याचा अनुभव हरियाणातल्या एका व्यक्तीला आला. गॅसच्या जवळ उभा राहून तो हँड सॅनिटायझर वापरत होता. अल्कोहोल ज्वालाग्रही आहे. त्यामुळे अपघात होऊन ही व्यक्ती 35% भाजली आहे. या 44 वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सॅनिटायझरमध्ये एथिल अल्कोहोलचं प्रमाण 62 टक्क्यांपर्यंत असू शकतं. त्यामुळे हा द्रवपदार्थ ज्वालाग्रही असतो. तो पटकन पेट घेतो. शिवाय हँड सॅनिटायझर म्हणजे त्यात केमिकल आलंच, त्यामुळे त्याचा अति वापर केल्यानं त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. बॉम्बे हॉस्पिटलमधील कन्सलटंट फिजिशिअन डॉ. गौतम भन्साळी यांनी ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलताना सांगितलं की, "प्रत्येक वेळी हँड सॅनिटायझर वापरायला हवं असं नाही. हँड सॅनिटायझरचा अति वापर केल्यानं स्किन इन्फेक्शन, स्किन अलर्जी होते. त्यामुळे काही कारण नसताना, गरज नसताना हँड सॅनिटायझर वापरू नका." अशा परिस्थितीत साबण आणि पाणी हाच सर्वात उत्तम असा पर्याय असल्याचं युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मेडिक सेंटर चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील (University of Pittsburgh Medical Center Children's Hospital) व्हायरोलॉजिस्ट डॉ. जॉन विल्यम्स म्हणाले. "साबण आणि पाण्यात हातांवरील जंतूंना शोषून घेऊन हातावरून घालवण्याची क्षमता असते. अल्कोहोलमुळे जंतूंचा नाश होईल, मात्र हातावरील अस्वच्छता दूर होणार नाही. त्यामुळे जर एखाद्याचे हात जास्त दूषित असतील, तर साबण आणि पाण्यानेच हात धुणं योग्य आहे", असं त्यांनी सांगितलं. हे वाचा - फक्त 20 सेकंद हात धुतल्याने जीवघेण्या Coronavirus चा नाश कसा होतो?
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus symptoms

    पुढील बातम्या