Home /News /lifestyle /

घाणेरडे कुठले! टॉयलेटनंतरही धुत नाहीत हात; आता काय म्हणावं या लोकांना

घाणेरडे कुठले! टॉयलेटनंतरही धुत नाहीत हात; आता काय म्हणावं या लोकांना

प्रामुख्याने कोरोना व्हायरस हा हाताला लागून तो शरीरात घुसतो असं संशोधनातू दिसून आलं होतं. त्यामुळे वारंवार हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

प्रामुख्याने कोरोना व्हायरस हा हाताला लागून तो शरीरात घुसतो असं संशोधनातू दिसून आलं होतं. त्यामुळे वारंवार हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) बचावावासाठी एकिकडे हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुण्याचा (hand washing) सल्ला देतो आहे. तर आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत, जे कधीच हात धुत नाहीत.

    नवी दिल्ली, 22 एप्रिल : जगभरात कोरोनाव्हायरसने (Coronavirus) 25 लाखांपेक्षा जास्त लोकांना विळखा घातला आहे, तर 1 लाख 77 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या कोरोनाव्हायरसवर सध्या तरी प्रभावी असा उपचार नाही, त्यामुळे व्हायरसपासून बचाव करणं हा एक मार्ग आहे. त्यासाठी साबण आणि पाण्याने वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो आहे, जेणेकरून व्हायरसपासून आपली सुरक्षा होईल. मात्र जगभरात असे कित्येक लोक आहेत जे कधीच हात धुत नाहीत. बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे. यामध्ये मोठ्या शहरांमधील मॉडर्न लोकांचाही यात समावेश आहे. 10 वर्षांपासून धुतले नाही हात हात न धुणाऱ्या अशाच लोकांपैकी एक आहेत ते अमेरिकेतील लोकप्रिय आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनाही आवडणाऱ्या टीव्ही शोचे होस्ट पिट हेगसेथ (Pete Hegseth). पिट यांनी ऑन एअर स्वीकार केलं आहे, की त्यांनी गेल्या 10 वर्षात एकदाही हाथ धुतले नाही. प्रिन्सटन युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट झालेले पीट यांच्या मते, व्हायरस दिसत नाहीत त्यामुळे ते नाहीत. अभिनेत्री टॉयलेटनंतरही धुत नाही हात पीट हे एकटेच नाहीत, तर अमेरिकेतील अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सही (Jennifer Lawrence) म्हणाली होती की टॉयलेटनंतर ती कधीच हात धुत नाही. राजकारणीही तसेच उत्तर कॅरोलिनातील रिपब्लिकन सिनेटेरने रेस्टॉरंटमध्ये हात धुण्याच्या सवयीची खिल्ली उडवत कर्मचाऱ्यांवर गरजेपेक्षा जास्त कायदे लादले जात असल्याचं म्हटलं होतं. कित्येक लोकं धुत नाहीत हात हात धुण्याच्या सवयीबाबत (Handwashing with soap - HWWS) 2015 साली झालेल्या एका अभ्यासानुसार जगभरातील 26.2% लोकं अशी आहेत जे टॉयलेटनंतर हात धुतच नाहीत. हात धुण्याच्या सवयीबाबत ऐकणं सोपं आहे, मात्र त्याची सवय करून घेणं तितकंच कठीण. हे वाचा - चीनमध्ये 2 महिन्यांनंतरही शरीरात व्हायरस जिवंत, बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोना लंडन स्कूल ऑफ हायजिन ट्रॉपिकल मेडिसीनमधील (London School of Hygiene and Tropical Medicine) सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ रॉबर्ट आँगर (Robert Aunger) यांच्या सांगण्यानुसार, 25 वर्षांपासून ते प्रयत्न करत आहेत, मात्र अद्यापही हँड वॉशिंगबाबत जागरूकता खूप कमी आहे. हात न धुण्यामागे काय आहेत कारणं? पाणी आणि साबण यासारख्या सुविधांचा अभाव हे एक कारण असू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील फक्त 27 टक्के लोकांकडे ही सुविधा आहे. शिवाय यामागे काही मानसिक कारणंही असू शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हातांमार्फत संक्रमण झाल्यानंतर आजारी पडेपर्यंत खूप दिवस जातात, तोपर्यंत आपण टॉयलेटनंतर हात धुतले नव्हते हे विसरून जातो आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर हे कारण सोडून बाकी सर्व कारणं देतो. दुसरं म्हणजे माझ्यासोबत काही चुकीचं होऊच शकत नाही असं अनेकांना वाटतं. ज्याला optimism bias म्हणतात. 2009 साली स्वाइन फ्लूच्या वेळी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, लोकांमध्ये इतकी सकारात्मकता होती की, लोकं मास्क लावणं आणि हात धुणं याला वायफळ समजत होतं. हे वाचा - तब्बल 25000 लोकांचा गूढ मृत्यू; जगात कोरोना बळींची संख्या अधिक असण्याची शक्यता रॉबर्ट यांच्या मते, यासाठी सामाजिक परिस्थितीही कारणीभूत असू शकते. आपण आपल्या आजूबाजूला कुणालाच हात धुताना पाहत नाही, त्यामुळे दिवसातून वारंवार हात धुणं आपल्याला गरजेचं वाटत नाही. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या