मुंबई, 13 जून : कण्हेरची फुले दिसायला जितकी सुंदर आहेत, तितकीच त्यांचे गुणही अधिक आहेत. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण कण्हेरची फुले आणि त्याची पानेही फायदेशीर आहेत. यात काही अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, ज्याचा वापर करून आपण अनेक आरोग्य समस्या कमी करू (kaner leaves health benefit) शकतो. विविध प्रकारच्या वेदना आणि तीव्र नागीण किंवा खाज येण्यावर आपण कण्हेरची पाने पेस्टच्या स्वरूपात वापरू शकता. हा घरगुती उपाय आपल्याला आराम देईल. कण्हेर वापरण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. प्लॅनेट आयुर्वेदा च्या बातमीनुसार, कण्हेरच्या पानांचा वापर कोणत्या समस्यांमध्ये होऊ शकतो हे जाणून घेऊया. केनरची पाने डाग-नायट्यांवर गुणकारी - डाग- नायटा घालवण्यासाठी कणेरची पाने खोबरेल तेलात शिजवून हे तेल त्यावर वापरावे. कण्हेरमध्ये आढळणारे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म डाग-नायट्यावर प्रभावी आहेत. त्यात आढळणारे अँटी-सेप्टिक गुणधर्म नागीणांच्या खुणा हलक्या करतात. सांधेदुखीवर प्रभावी - कण्हेरच्या पानांची पेस्ट बनवण्यासाठी कण्हेरची ताजी पाने घ्या. बारीक करून त्यात ऑलिव्ह ऑईल टाकून हलके गरम करा. ही पेस्ट दुखणाऱ्या भागावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. मग असेच सोडून द्या. ही पेस्ट हाडांना आतून आराम देते आणि सांध्यांची सूज कमी करते. हे वाचा - Skin Care Tips: ‘हे’ घरगुती उपाय करा अन् चेहऱ्यावरील पिंपल्सपासून मिळवा मुक्तता जुन्या जखमा बऱ्या होतील - तुमची कोणतीही जखम खूप जुनी झाली असेल आणि ती बरी होत नसेल तर कण्हेरची पाने बारीक करून त्यात कोरफडीचे जेल मिसळून जखमेवर लावा. या पेस्टने तुमची जुनी जखम लवकर बरी होण्यास सुरुवात होईल. खाज कमी करण्यासाठी प्रभावी - कण्हेरच्या पानात कोणत्याही प्रकारची खाज कमी करण्याचे गुणधर्म आढळतात. यासाठी कण्हेरची पाने लवंग किंवा पेपरमिंट तेलात शिजवून खाज येत असल्यास हे तेल वापरू शकता. खाज सुटण्यापासून आराम मिळेल. हे वाचा - चिकनवर ताव मारणाऱ्यांना कोंबडीविषयी ‘ही’ गोष्ट नक्की माहीत नसणार कीटक चावल्यावर - कणेरची पाने खोबरेल तेलात शिजवल्यानंतर थोडी काळी मिरी बारीक करून मिक्स करा. कीटक चावलेल्या जागेवर हे तेल लावा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि पुरळ उठणार नाहीत. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







