कॅनबेरा, 28 ऑक्टोबर : कित्येक तरुण हँडसम दिसण्यासाठी, किंवा मग मुलींना इम्प्रेस करण्यासाठीही दाढी वाढवतात. पण दाढी ठेवण्याचे केवळ हेच फायदे (Benefits of beard) नसतात. दाढी ठेवल्यामुळे कित्येक आजारांपासूनही (Beard saves you from diseases) सुटका मिळते, असं एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियामधील क्वीन्सलँड विद्यापीठात (Australia university research on beard) याबाबत संशोधन करण्यात आलं.
ऑक्टोबर संपत आला की जगभरातील तरुणाईला 'नो शेव्ह नोव्हेंबर'बद्दल (No shave november) विचार करायला लागते. या ट्रेंडमध्ये भाग घेणारे सर्व लोक नोव्हेंबरचा पूर्ण महिना दाढी करत नाहीत. हा ट्रेंड मुख्यत्वाने जगातील कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी असतो. या महिन्यात दाढी आणि केस न कापून जे पैसे वाचवले जातात ते कॅन्सरबद्दल जनजागृती करणाऱ्या संस्थेला मदत म्हणून दिले जातात. कॅन्सरग्रस्तांसाठी मदत म्हणून वाढवलेली हीच दाढी कॅन्सरला दूर ठेवण्यातही मदत करते (Beard saves from Skin cancer).
संशोधनानुसार 90 टक्के हानीकारक अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून (Beard saves you from UV rays) दाढी पुरूषांच्या चेहऱ्याचे संरक्षण करते. यामुळेच पुरूषांना त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोकाही दाढीमुळे कमी होतो. तसंच चेहरा आणि गळ्याच्या त्वचेवर चट्टे येण्यापासूनही संरक्षण मिळतं.
हे वाचा - डासांचा खात्मा करणारं Penis mushroom; यावर बसताच मरतात डास
या संशोधनाचे मुख्य लेखक अल्फियो पेरिसी यांनी दी इंडिपेडंटला सांगितलं, की दाढी सूर्यप्रकाशाला पूर्णपणे अडवून ठेवत नसली, तरी घातक किरणांना त्वचेपर्यंत पोहोचवण्यापासून नक्कीच थोपवते.
दाढीचे इतरही फायदे संशोधनातून आले समोर
या संशोधनातून इतरही काही गोष्टी समोर आल्या आहेत. दाढी असलेले पुरूष महिलांना अधिक आवडतात, तसेच दाढी असणारे पुरूष इतरांच्या तुलनेत अधिक काळ जगतात (Men with beard live longer) असंही या संशोधनातून समोर आलं आहे.
यासोबतच या संशोधनात असंही म्हटलं आहे, की जे पुरूष दाढी ठेवतात त्यांची सेक्स लाईफही (Men with beard have better sex life) अधिक आनंददायी असते. झी न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
दाढी ठेवणाऱ्या पुरूषांना कमी प्रमाणात सनस्क्रीनची गरज भासते. तर, क्लिन शेव्ह करणाऱ्यांना आपला चेहरा सूर्याच्या घातक किरणांपासून संरक्षणासाठी अधिक प्रमाणात सनस्क्रीनची गरज असते.
तसंच, दाढी न ठेवणाऱ्यांच्या मानेची आणि चेहऱ्याची त्वचा अधिक काळ उघडी राहिल्यामुळे त्या ठिकाणी चट्टे येण्याचीही भीती असते. दाढी ठेवणाऱ्या लोकांना अशा कोणत्याही गोष्टीची भीती (Benefits of beard) नसते.
हे वाचा - तुम्हाला Viagra सारखा जोश देतील या 7 गोष्टी; असा करा आहारात समावेश
एकंदरीत, दाढी ठेवल्यामुळे केवळ हँडसम दिसणे आणि तरुणींना इम्प्रेस करणे एवढेच फायदे होत नाहीत. त्याचे इतरही बरेच फायदे आहेत. यामुळे तुम्हीदेखील काही कारणाने दाढी ठेवत नसाल, तर या नोव्हेंबरमध्येच दाढी वाढवण्यास सुरूवात करू शकता.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. त्यामुळे अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.