मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /White fungus ने रुग्णाची आतडीच पोखरून काढली; पहिलंच भयंकर प्रकरण समोर

White fungus ने रुग्णाची आतडीच पोखरून काढली; पहिलंच भयंकर प्रकरण समोर

व्हाइट फंगस (White fungus) झालेल्या या  महिलेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

व्हाइट फंगस (White fungus) झालेल्या या महिलेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

व्हाइट फंगस (White fungus) झालेल्या या महिलेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

नवी दिल्ली, 27 मे : कोरोनाच्या (Coronavirus) संकटात फंगसचंही (Fungus) मोठं संकट येऊन ठेपलं आहे. ब्लॅक फंगस (Black fungus), व्हाइट फंगस (White Fungus), येलो फंगस (Yellow fungus) अशा वेगवेगळ्या फंगल इन्फेक्शनची प्रकरणं समोर येत आहेत. त्यात आता व्हाइट फंगसचं भयंकर असं प्रकरण समोर आलं आहे. या फंगसनं एका रुग्णांची अक्षरश: आतडीच पोखरून काढली आहेत. या रुग्णाच्या आतड्यांमध्ये छेद झाले (White Fungus cause hole in intestine) आहेत. व्हाइट फंगसमुळे आतड्यांमध्ये होल झालेलं हे पहिलंच प्रकरण भारतात आढळलं आहे.

49 वर्षांच्या महिलेला पोटात तीव्र वेदना होत होत्या. तिला उलटी आणि डायरियाही होता, तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता.  13 मे रोजी 2021 रोजी सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिच्या तपासण्या केला आणि रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्काच बसला.

रुग्णालयाच्या सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी अँड सीवर ट्रान्सप्लांटेशन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिटी स्कॅनमध्ये या महिलेच्या पोटात हवा आणि द्रव असल्याचं दिसलं. तिच्या आतड्यांमध्ये छेद असल्याचं हे लक्षण होतं. तिच्या अन्ननलिकेत, छोट्या आणि मोठ्या आतड्यांमध्ये छेद झाले होते.

हे वाचा - अरे बापरे! तोंडाबाहेर लटकतेय जीभ; कोरोना रुग्णाला झाला भलताच साइड इफेक्ट

रुग्णालयातील डॉक्टर अनिल अरोरा यांनी सांगितलं की, "रुग्णाची प्रकृती खूपच नाजूक होती. आम्ही रुग्णाच्या पोटातून जवळपास एक लीटर पस आणि बाइल लिक्विट काढलं. त्यानंतर तात्काळ तिचं ऑपरेशन करण्यात आलं.

या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल चार तास ही सर्जरी चालली. डॉक्टर समीरन नंदी यांनी सांगितलं की, "चार तास आम्ही ही आव्हानात्मक सर्जरी केली. महिलेच्या अन्ननलिका आणि आतड्यांचा छेद बंद करण्यात आला आहे. तिच्या आतड्यांतून लिक्विडता होणार स्राव थांबवला आहे. छोट्या आतड्यांना गँगरीनही झाला होता. तो भाग काढून टाकण्यात आला आहे आणि आतड्यांचा एक छोटा भाग बायोप्सीसाठी पाठवला"

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर रुग्णाच्या या रुग्णाची तपासणी केली असता, ही समस्या व्हाइट फंगसमुळे उद्भवल्याचं निदान झालं.

हे वाचा - मानवी शरीरावर आधीपासूनच आहे अगणित फंगसचं वास्तव्य, आढळतात 80 प्रकारच्या बुरशी

"आतड्यांच्या बायोप्सीमुळे आम्हाला समजलं की, तिच्या आतड्यांमध्ये व्हाइट फंगस होतं", असं डॉ. अरोरा यांनी सांगितलं. अँटीफंगल ट्रिटमेंटनंतर रुग्णाला आराम मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Serious diseases