मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

महिलांसाठी नाही पुरुषांसाठी तयार झाल्या होत्या ‘हाय हिल्स’! निर्मितीमागची भन्नाट गोष्ट माहीत आहे का?

महिलांसाठी नाही पुरुषांसाठी तयार झाल्या होत्या ‘हाय हिल्स’! निर्मितीमागची भन्नाट गोष्ट माहीत आहे का?

मुलींच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये High Heels हा महत्त्वाचा भाग असतो. पण मुळात या हाय हिल्स पुरुषांसाठी तयार करण्यात आल्या होत्या. आश्चर्य वाटेल संशोधनामागची गोष्ट ऐकून.

मुलींच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये High Heels हा महत्त्वाचा भाग असतो. पण मुळात या हाय हिल्स पुरुषांसाठी तयार करण्यात आल्या होत्या. आश्चर्य वाटेल संशोधनामागची गोष्ट ऐकून.

मुलींच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये High Heels हा महत्त्वाचा भाग असतो. पण मुळात या हाय हिल्स पुरुषांसाठी तयार करण्यात आल्या होत्या. आश्चर्य वाटेल संशोधनामागची गोष्ट ऐकून.

दिल्ली, 7 डिसेंबर: कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला असोत किंवा कॉलेज तरुणी किंवा अगदी छोट्या मुली...प्रत्येक मुलीला हाय हिल्स (High heels) घालायला आवडतात. कधी ऑफिससाठी आवश्यक म्हणून तर कधी स्टाईल म्हणून हाय हिल्सच्या चप्पल, शूज घालायला विशेष पसंती दिली जाते. हाय हिल्स घातल्यावर महिलांचा आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्वामध्ये एक रुबाब येतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. पण महिलांमध्ये लोकप्रिय असलेल्या या हिल्स खरं तर पुरुषांसाठी बनवण्यात आल्या होत्या हे तुम्हाला माहिती आहे का ? याचबद्दलचं वृत्त ‘झी न्यूज’ नं दिलं आहे.

महिलांच्या स्टाईल स्टेटमेंट (Style) बनलेल्या हाय हिल्स पुरुषांसाठी का बरं तयार केल्या असतील असा प्रश्न नक्कीच आपल्या मनात येतो. युद्धात म्हणजे लढाई करताना किंवा घोडेस्वारी करताना पुरुष हाय हिल्स (High heels origin) वापरत असत असं मानलं जातं. घोडेस्वारी करताना हाय हिल्समुळे पकड घट्ट होते. त्यामुळेच घोडेस्वार बुटांना आवर्जून हाय हिल्स लावून घेत असतं असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दहाव्या शतकापासून हाय हिल्स वापरायला सुरुवात झाली असं मानलं जातं. 1740 च्या सुमारास पहिल्यांदा महिलांनी हाय हिल्स वापरायला सुरुवात केली. त्यानंतर फक्त 50 वर्षांमध्ये पुरुषांसाठी म्हणून तयार करण्यात आलेल्या खास हाय हिल्स पुरुषांच्याच पायांतून हद्दपार झाल्या आणि महिलांच्या मात्र अगदी आवडत्या बनल्या. अर्थातच काळानुसार हाय हिल्समध्ये अनेक बदल झाले आहेत. आता फक्त गरज म्हणून किंवा हाय सोसायटीततील महिलाच नाही तर अगदी सर्वसामान्य महिलाही हाय हिल्स घालतात.

बापरे! Hair Dye मुळे महिलेची भयंकर अवस्था; पाहून चुकूनही केसांना कलर करणार नाही

सर्वांत आधी पर्शिया साम्राज्यातील (Persia Kingdom) पुरुषांनी हाय हिल्स वापरायला सुरुवात केली. युध्दाच्या वेळेस या राज्याच्या सैनिकांनी हाय हिल्स असलेले बूट वापरले होते. सुरक्षेच्या दृष्टीने हाय हिल्स अत्यंत मजबूत आणि अधिक चांगले आहेत असं मानलं जात असे. 1599 पर्शियाचा राजा शाह अब्बासनं त्याचा राजदूत युरोपमध्ये पाठवला होता. या राजदूताच्या माध्यमातून हाय हिल्स ही युरोपमध्ये पोहोचले. काही काळातच जगभरात हाय हिल्स घालणाऱ्यांची संख्याही वाढली. अनेक देशांमध्ये हळूहळू हाय हिल्स घालणाऱ्यांची संख्या वाढली. विशेष म्हणजे हाय हिल्स घालणे ही राजे आणि श्रीमतांची आवड बनली. फ्रान्सचा राजा चौदावा (France King 14 th Luee) लुईसची उंची फक्त पाच फूट चार इंच होती. त्यामुळे तो चक्क दहा इंचाचे बूट घालायचा.

Weight Loss: पोटावर चरबीचा घेर वाढलाय? या 4 प्रकारच्या पिठांचा आहारात करा समावेश

अर्थातच आता हाय हिल्स घालणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. फक्त कॅट वॉक, रॅम्पवॉक, पार्टीसाठी नाही तर अगदी सर्वसामान्य रस्त्यांवर चालतानाही हाय हिल्स घातले जातात. पण सतत हाय हिल्स घातल्याने काही त्रासही होतात. याचा थेट परिणाम नितंब, पाठीचा कणा, गुडघे आणि टाचेवर होतो. जास्त काळ हाय हिल्स घातल्याने सांधेदुखीही होऊ शकते. हाय हिल्स वापरणं आवडो ना आवडो..पण त्याचा इतिहास मात्र रंजक आहे हे नक्की.

First published:

Tags: Fashion, S