Home /News /lifestyle /

Weight Loss: पोटावर चरबीचा घेर वाढलाय? या 4 प्रकारच्या पिठांचा आहारात करा समावेश

Weight Loss: पोटावर चरबीचा घेर वाढलाय? या 4 प्रकारच्या पिठांचा आहारात करा समावेश

आपल्याला चपाती-पोळी किंवा रोटी खायला आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का की, पंजाबपासून महाराष्ट्र-कर्नाटकसह बिहारपर्यंत अनेक प्रकारच्या पोळ्या/रोट्या/भाकरी बनवल्या जातात. यात गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांचा समावेश असतो.

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर : आपल्या सर्वांच्या आहारातील मुख्य घटक असतात पोळी, भात, भाज्या आणि डाळी. आपल्यापैकी बरेच जण अनेकदा बाहेर जेवायला जातात. आपल्याला चपाती-पोळी किंवा रोटी खायला आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का की, पंजाबपासून महाराष्ट्र-कर्नाटकसह बिहारपर्यंत अनेक प्रकारच्या पोळ्या/रोट्या/भाकरी बनवल्या जातात. यात गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांचा समावेश असतो. पोळ्या/रोट्या/भाकरी खाण्याची प्रत्येकाची स्वतःची चव असते. प्रत्येकजण आहारात यांचा समावेश करतो. म्हणूनच, जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा अनेकजण पोळ्या/रोट्या/भाकरी खाणं बंद (Weight Loss) करतात. आहारातून पोळ्या/रोट्या/भाकरी काढून टाकणं सोपं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भाकरींविषयी सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश करू शकता. या पिठांच्या (Multigrain Atta) आरोग्यदायी फायद्यांबद्दल जाणून घेऊया. या पिठाचा स्थूलपणा कमी करण्यात खूप फायदा होऊ शकतो. या पिठांमध्ये भरपूर फायबर आणि पोषक तत्त्वं असतात. टीव्ही9 ने याच्याबद्दल माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल- स्थूलपणा आटोक्यात आणण्यासाठी या पिठांचा करा वापर 1 - ज्वारीचं पीठ वाढता स्थूलपणा कमी करायचा असेल तर, ज्वारीच्या पिठाचा आहारात समावेश करा. कारण, ज्वारीचं पीठ ग्लूटेन फ्री असतं. यामध्ये प्रथिनं, फायबर, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यांची पचनक्रिया चांगली नाही, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. हे पीठ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी देखील सर्वोत्तम आहे. हे पीठ मळताना त्यात थोडं गव्हाचं पीठही घालू शकता. यामुळं ज्यांना भाकरी बनवता येत नाही, त्यांनी ती बनवणं सोपं जाऊ शकतं. हे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा 2- नाचणीचं पीठ नाचणीचं पीठदेखील ग्लुटेनमुक्त आहे. त्यात फायबर आणि अमीनो अ‌ॅसिड्सदेखील आढळतात. त्याची रोटी खाल्ल्यानं पोट बराच काळ भरलेलं राहतं, भूक कमी होते आणि वजन झपाट्यानं कमी होण्यास मदत होते. इतकंच नाही तर याची भाकरी ज्वारीप्रमाणेच पोटाला पचायलाही सोपी जाते. 3- बाजरीचे पीठ बाजरीचं पीठदेखील ग्लुटेनमुक्त आहे. या पिठात प्रथिनं, फायबर, मॅग्नेशियम, लोह आणि इतर पोषक तत्त्वं मुबलक प्रमाणात आढळतात. या पिठाचं वैशिष्ट्य म्हणजे, या पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. त्याची भाकरी खाल्ल्यानंतर तहानही भरपूर लागते. यामुळं आपोआप जेवणाचं प्रमाण कमी होतं. हे वाचा - Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल 4-जंव किंवा ओट्सचं पीठ ओट्सच्या पिठामुळं जास्त काळ पोट भरल्यासारखं वाटतं. या पिठात विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर आढळतात. हृदयविकारासाठीही हे पीठ फायदेशीर मानलं जातं. मधुमेहींसाठीही हे खूप फायदेशीर आहे. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Weight loss, Weight loss tips

    पुढील बातम्या