मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Earphones वर सतत मोठ्या आवाजात ऐकताय? बहिरेपणाचा धोका, WHO चा इशारा

Earphones वर सतत मोठ्या आवाजात ऐकताय? बहिरेपणाचा धोका, WHO चा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एक अब्जाहून अधिक तरुणांना बहिरे होण्याचा धोका आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या इयरफोन्स वापरण्याच्या पद्धती.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एक अब्जाहून अधिक तरुणांना बहिरे होण्याचा धोका आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या इयरफोन्स वापरण्याच्या पद्धती.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एक अब्जाहून अधिक तरुणांना बहिरे होण्याचा धोका आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या इयरफोन्स वापरण्याच्या पद्धती.

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : आजूबाजूच्या कोणालाही त्रास होऊ न देता एकट्याने गाण्यांचा घ्यायचा असेल, तर इयरफोन्सना पर्याय नाही. पण इयरफोन्सचा प्रमाणापेक्षा जास्त वेळ वापर झाला, तसंच इयरफोन्सवर (Earphones) दीर्घ काळ मोठ्या आवाजात संगीत ऐकत राहिलं, तर बहिरेपणा येऊ शकतो. अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एक अब्जाहून अधिक तरुणांना बहिरे होण्याचा धोका आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या इयरफोन्स वापरण्याच्या पद्धती. त्यामुळेच योग्य काळजी घेतली तर हे संभाव्य बहिरेपण (Deafness) टाळता येण्यासारखं आहे.

इयरफोन्स आपल्या कानांना कशा प्रकारे हानी पोहोचवू शकतात, हे समजून घेण्यासाठी आपल्या कानाचं कार्य कसं चालतं, याची माहिती घेतली पाहिजे. ध्वनिलहरी आपल्या कानाजवळ पोहोचतात, तेव्हा कानाचा बाह्य भाग त्या ग्रहण करतो आणि त्या लहरी कानाच्या पोकळीतून जाऊन कानाच्या पडद्यावर आदळतात. कानाचा पडदा म्हणजे एक असं आवरण असतं, की जे बाह्य कान आणि आतला कान यांची विभागणी करतं. ध्वनिलहरी कानाच्या पडद्यावर आदळतात, तेव्हा तो पडदा हलतो. त्यामुळे कानातली तीन छोटी हाडं कंप पावतात. ही हाडं ध्वनींची ती कंपनं वाढवतात आणि ती गोगलगायीच्या आकाराच्या कॉक्लिआ नावाच्या एका कप्प्यात पाठवतात. या कॉक्लिआमध्ये एंडोलिम्फ नावाचा द्रवपदार्थ असतो. कंपनं कॉक्लिआमध्ये (Cochlea) आल्याने त्या द्रवपदार्थात लाटासदृश तरंग (Waves) निर्माण होतात.

थंडीच्या दिवसात रोज एक केळ खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या योग्य वेळ

कॉक्लिआच्या आतल्या भागात स्टिरिओसीलिया (Stereocilia) नावाचे केसांचे पुंजके असतात. कॉक्लिआमध्ये आलेल्या तरंगांमुळे स्टिरिओसीलिया हलतात आणि त्या तरंगांचं ते इलेक्ट्रिक संदेशात रूपांतर करतात. हे संदेश मेंदूला पाठवले जातात. मेंदू त्यांचा अर्थ लावतो. स्टिरिओसीलियाचे वेगवेगळे पुंजके वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला सेन्सिटिव्ह (Sensitive) असतात. दीर्घ काळ मोठा आवाज कानात येत राहिला, तर स्टिरिओसीलियाची लवचिकता जाते आणि त्यांची संवेदनशीलताही नष्ट होऊ शकते. परिणामी बहिरेपणा येतो, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दिली आहे.

तुमच्या या चुकीच्या सवयी हृदयावर आणतात एक्स्ट्रा प्रेशर, होऊ शकतात भयंकर परिणाम

'नॅशनल जर्नल ऑफ फिजिऑलॉजी, फार्मसी अँड फारमॅकॉलॉजी'मध्ये यंदा प्रकाशित झालेल्या एका संशोधनविषयक लेखात असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे, की जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांना इयरफोन्सचा आवाज 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवून गाणी ऐकायला आवडतं. त्यामुळे त्यांना बहिरेपणा येण्याचा धोका मोठा आहे.

इयरफोन्सच्या तुलनेत हेडफोन्स (Headphones) काही अंशी बरे मानले जातात. कारण ते कानात घातले जात नाहीत, तर बाहेर लावले जातात. त्यामुळे त्यात थोडं अंतर असतं. अर्थात, हेडफोन्सवरही मोठ्या आवाजात संगीत ऐकलं, तर त्याचा दुष्परिणाम होतोच.

ताण-तणावावर प्रभावी उपाय, अश्वगंधाचे फायदे एकदा वाचाच!

अमेरिकेतल्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन या संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मोठा आवाज सतत एक तास कानावर पडत राहिला तर कानांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे इयरफोन्स किंवा हेडफोन्स लावून ऐकताना मध्ये छोटे ब्रेक्स घेणं आवश्यक आहे. दर 30 मिनिटांनी 5 मिनिटांचा, दर एक तासाने 10 मिनिटांचा ब्रेक घ्यायला हवा. हेडफोन्स किंवा इयरफोन्समध्ये आवाज खूप मोठा ठेवू नये. तसंच, इयरफोन्सचं वेळोवेळी सॅनिटायझेशन करणंही आवश्यक आहे.

First published:

Tags: Ear, Health Tips