मुंबई, 29 जानेवारी : आजच्या युगात मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे, परंतु तो सामान्य मानला तर कोणासाठीही हानीकारक ठरू शकते. मधुमेह हा एक जुनाट आजार आहे, जो एकदा झाला की तो कधीच संपत नाही. मधुमेहावर पूर्ण इलाज नाही. हा आपल्या आहार आणि जीवनशैलीशी निगडीत आजार आहे, त्यामुळे त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.
जेव्हा स्वादुपिंड योग्य प्रकारे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा आपले शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. तेव्हा मधुमेहाची समस्या उद्भवते. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, मधुमेहाची सुरुवातीची कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नसली तरी अनेक लहान-लहान लक्षणे आपल्याला दिसतात. अनेक वेळा लोक या चिन्हांना सामान्य मानून दुर्लक्ष करतात.
Bile Duct Cancer : बाईल डक्ट कॅन्सर म्हणजे काय? पाहा काय आहेत त्याची लक्षणं
ज्या प्रकारे आपल्याला शरीरातून इतर रोगांचे सिग्नल मिळतात, त्याच प्रकारे मधुमेह झाल्यानंतरही आपले शरीर सिग्नल देऊ लागते. शरीराचे अनेक भाग मधुमेहाचा इशारा देतात. चला जाणून घेऊया रक्तातील साखर वाढल्यावर शरीराच्या कोणत्या भागातून आपल्याला सर्वप्रथम सिग्नल मिळू लागतात…
डोळे : जर तुम्हाला काही दिवस डोळ्यांतील दृष्टी संबंधित समस्या येत असतील तर ते मधुमेहामुळे देखील असू शकते. रक्तातील उच्च साखर रेटिनाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करते, ज्यामुळे प्रकाशाशी संबंधित समस्या उद्भवतात. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास अंधुक दृष्टी, काचबिंदू आणि मोतीबिंदू यांसारख्या आजारांची शक्यता अनेक पटींनी वाढते.
पाय : मधुमेहामुळे पायांमध्ये दोन प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामध्ये न्यूरोपॅथी आणि फेरीफेरल व्हॅस्क्युलर डिसीज यांचा समावेश होतो. डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये पायांच्या नसा खराब होतात. तर फेरीफेरल व्हॅस्क्युलर डिसीजमध्ये रक्त प्रवाह प्रभावित होतो. जर तुम्हाला अचानक पायात मुंग्या येणे किंवा बधीरपणा येणे, पायात फोड येणे किंवा अंगठ्याजवळ त्वचा घट्ट होणे अशी लक्षणे दिसली तर त्यामागे रक्तातील साखरेचे प्रमाण मोठे असू शकते.
किडनी : किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण हा भाग शरीरातील दूषित आणि विषारी पदार्थांना फिल्टर करतो. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास आपल्या किडनीवरही परिणाम होतो. किडनीमध्ये लहान रक्तवाहिन्या असतात, ज्या उच्च रक्तातील साखरेमुळे खराब होतात, ज्यामुळे मूत्रपिंडाचा आजार होण्याची शक्यता वाढते.
नसाही खराब होतात : रक्तातील साखरेमुळे शरीराच्या मज्जासंस्थेलाही खूप नुकसान होते, त्यामुळे शरीराच्या अवयवांमध्ये मुंग्या येणे, वेदना वाढणे, शरीराचे तापमान वाढणे, हातपायांमध्ये क्रॅम्प येणे, पायात अल्सर होण्याच्या समस्या. जसे संसर्ग होणे आणि संसर्गाच्या पकडीत येणे असे प्रकार घडू लागतात.
हृदय आणि रक्तवाहिन्या : आपले हृदय आणि रक्तवाहिन्या देखील उच्च रक्त शर्करा दर्शवतात. मधुमेहामुळे रक्तवाहिन्या खराब होण्याचा धोका असतो आणि त्यामुळे रुग्णाला हृदयविकाराचा झटका आणि पॅरालिसिसची शक्यता अनेक पटींनी वाढते.
तुमच्या शरीरात 'हे' बदल दिसतायेत? वेळीच सावध व्हा असू शकतो किडनीशी संबंधित आजार
हिरड्या : रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने हिरड्यांचे आजार होतात. हा एक अतिशय सामान्य रोग आहे, जो पीरियडॉन्टल रोग म्हणून ओळखला जातो. साखरेमुळे हिरड्यांमधील रक्ताभिसरण कमी होऊन स्नायू कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे तोंडात बॅक्टेरियाचा प्रभाव वाढतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diabetes, Health, Health Tips, Lifestyle