मुंबई, 27 मार्च : मगर (Crocodile) अजिबात हालचाल न करता शांतपणे बसणारा प्राणी. पाणी किंवा अगदी जमिनीवरसुद्धा मगर अशी बसली असेल तर तिला ओळखणंसुद्धा कठीण जातं. तिचे डोळे बंद उघडे असतील तर ठिक आहे पण डोळे बंद असतील तर माणसांनासुद्धा ती मगर आहे की दगड हे ओळखता येत नाही. त्यांच्या रंगामुळे आणि शरीर रचनेमुळे माणसंसुद्धा कन्फ्य़ुझ होतात. मग इतर प्राणी किंवा पक्ष्यांचं काय? अशीच एक कोंबडी मगरीला (Hen walking on crocodile) दगड समजून तिच्यावरून चालली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. मगरीवरून चालणाऱ्या कोंबडीचा व्हिडीओ पाहाल तर तुम्हीच बसल्या जागेवर उडाल. हा व्हिडीओ म्हणजे अक्षरश: काळजाचा ठोका चुकवणारा आणि अंगावर काटा आणणारा असाचा आहे.
2020 से 2021... फिर 2021 की शुरुआत.... बस ऐसी👇है
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 26, 2021
😅😅 pic.twitter.com/uqKNYyVROm
व्हिडीओत पाहू शकता एका नदीत मगर आहे आणि तिच्यावर कोंबडी. मगर पाण्यात अगदी शांत बसली आहे. या मगरीवरून एक कोंबडी छान आपल्याच धुंदीत चालत आहे. आपण नेमकं कशावरून चालत आहोत याची साधी कल्पनाही तिला नाही. मगरीच्या पाठीवरून चालत चालत ती तिच्या तोंडापर्यंत येते. तिथं थोडा वेळ उभीसुद्धा राहते आणि मगरीच्या तोंडावरून ती जमिनीवर उडी मारणार इतक्यात मगर आपला भलामोठा जबडा उघडते. हे वाचा - OMG! छोट्याशा बेडकाची हिंमत तर पाहा; चक्क महाकाय सापावरच करतोय राइड; VIDEO VIRAL त्याच क्षणी कोंबडी उडते. त्याचवेळी या मगरीच्या शेजारीसुद्धा आणखी एक मगर पाण्याच्या आत असल्याचं दिसतं आहे. सुदैवाने कोंबडी उडाल्याने ती मगरीपासून काही अंतर दूर जाते. त्यामुळे मगरीच्या तावडीत ती काही सापडत नाही. मगरीने जबडा उघडताच ज्या वेगाने कोंबडी उडते त्याचवेळी त्याच वेगाने आपल्या हृदयाची धडधडसुद्धा वाढते. हे वाचा - बोटीतून पक्ष्याला देत होता खाणं; समुद्रातून आला भलामोठा मासा आणि… धडकी भरवणारा आयपीएस अधिका दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओचा संबंध 2020 आणि 2021 या वर्षाशी जोडला आहे. ‘2020 पासून 2021… पुन्हा 2021 शी सुरुवात अशी झाली आहे’, असं मजेशीर कॅप्शन त्यांनी दिलं आहे. कोरोनाचा कमी झालेला धोका पुन्हा वाढताना पाहून त्यांनी या व्हिडीओमार्फत त्याच परिस्थितीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.