मुंबई, 26 मार्च : साप बेडकाला (Frog and snake video) खातो हे आपणा सर्वांना माहितीच आहे आणि जिथं आपला मृत्यू आहे त्या दिशेनं कुणीच जात नाही. पण एका बेडकाने (Frog video) मात्र ती हिंमत केली. त्याने चक्क सापावरच राइड (snake video) केली आहे. स्वतःहून तो मृत्यूच्या दारात जातो आहे. सापावर राइड करणाऱ्या या बेडकाचा (Frog ride on snake) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. आपल्या शत्रूशी पंगा कधीच घेऊन नये, असं म्हणतात. पण बेडकाने आपल्या कट्टर शत्रूशी सापाशी पंगा घेण्याचं धाडस केलं. महाकाय सापाच्या शरीरावर तो चक्क राइड करायला गेला. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याला त्यांनी राइड द डेथ असं कॅप्शन दिलं आहे.
Ride the death...
— Susanta Nanda (@susantananda3) March 26, 2021
No excuses, no expectations pic.twitter.com/374y71lYPf
व्हिडीओत पाहू शकता, पिवळ्या रंगाचा हा विशाल साप आहे. तो गवतातून हळूहळू सरपटत पुढे जात आहे. त्यावर बेडूक बसला आहे आणि बेडूक अगदी मस्त त्या सापावर घसरताना दिसतं आहे. जणू सापावर तो राइडच करत आहे. आता आपण कशावर राइड करतो आहोत हे या बेडकाला माहिती आहे की नाही हे तर माहिती नाही. हे वाचा - माणसांनाही लाजवेल असं भटक्या कुत्र्यांनी केलं काम; VIDEO पाहून कराल सलाम जर माहिती असेल तर तो स्वेच्छेने मृत्यूच्या दारात जात असावा. आनंदाने मृत्यूला कवटाळण्याचा त्याचा प्रयत्न असावा आणि जर त्याला आपण ज्यावर मस्त खेळत आहोत तो साप आहे हे माहिती नसेल तर मग मात्र पुढे मृत्यू आपली वाट पाहत आहे, मृत्यू दारात उभा आहे, याची कल्पना त्या बिचाऱ्याला नसावी. आणखी एक ज्या सापावरून हा बेडूक जातो आहे, त्यालादेखील आपल्या पाठीवर काहीतरी आहे हे साधं जाणवतही नाही आहे. हे वाचा - माकडाशी पंगा घेणं वाघाला महागात; शिकारीसाठी झाडावर चढताच काय झालं पाहा VIDEO आता या व्हिडीओत पुढे काय झालं असावं हे तर दिसत नाही आहे. पण हा बेडूक नकळत असं करत आहे? की मुद्दाम? सापाला खरंच या बेडकाबाबत काही माहिती नाही? की तोसुद्धा सावधपणे आपली शिकार करण्याच्या तयारीत आहे? की या सापात आणि बेडकात मैत्री असावी? तुम्हाला काय वाटतं? या व्हिडीओचा क्लायमॅक्स काय असू शकतो? तुमची प्रतिक्रिया जरूर द्या. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींनासोबतसुद्धा ही बातमी शेअर करा आणि त्यांच्यासुद्धा यावर प्रतिक्रिया जाणून घ्या. पाहूयात तुमच्या सर्वांच्या मते, या व्हिडीओचा शेवट काय असू शकतो.