मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss Tips: लवकर वजन कमी करायचंय?, मग आहारात समावेश करा 'हे' हेल्दी होममेड Drinks

Weight Loss Tips: लवकर वजन कमी करायचंय?, मग आहारात समावेश करा 'हे' हेल्दी होममेड Drinks

Weight Loss Tips:  वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जिमपासून(Gym) ते महागड्या औषधांपर्यंत अनेक पर्याय वापरले जातात.

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जिमपासून(Gym) ते महागड्या औषधांपर्यंत अनेक पर्याय वापरले जातात.

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जिमपासून(Gym) ते महागड्या औषधांपर्यंत अनेक पर्याय वापरले जातात.

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: आजच्या या धकाधकीच्या जीवनात वजन वाढण्याच्या (Weight Gain) समस्येने अनेक जण त्रस्त आहेत. घरून काम करणाऱ्या व्यक्तींमधे ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जिमपासून(Gym) ते महागड्या औषधांपर्यंत अनेक पर्याय वापरले जातात. तुम्ही काही घरगुती पेय तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करून वजन कमी (Weight Loss) करू शकता. त्याबद्दल जाणून घेऊया अधिक माहिती.

जिऱ्याचं पाणी

वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिऱ्याचं (Cumin water) पाणी पिऊ शकता. हे पाणी तयार करण्यासाठी जिरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी जिऱ्यातील पोषक तत्वं शोषून घेतं. सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि रिकाम्यापोटी प्या. टीव्ही 9 हिंदीने यासंदर्भात वृत्त दिलंय.

अ‍ॅपल सीडर व्हिनेगर

वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात अ‍ॅपल सीडर व्हिनेगरचा (apple cider vinegar) समावेश करू शकता. एक कप गरम पाण्यात एक चमचा अ‍ॅपल सीडर व्हिनेगर मिसळून ते प्या. त्यात अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड असते. हे शरीरातील मेटॅबॉलिझमचा रेट वाढवून शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

दालचिनीचं पाणी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि वजन कमी करण्यासाठी दालचिनी (cinnamon water) खूप फायदेशीर आहे. दालचिनी रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अर्धा चमचा दालचिनी पावडर एका ग्लास कोमट पाण्यात टाकून सेवन करू शकता. या पेयाची चव वाढवण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि मधदेखील घालू शकता. याचे नियमितपणे रिकाम्यापोटी सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

मेथीचा चहा

वजन कमी करण्यासाठी तुम्ही मेथीचा चहादेखील घेऊ शकता. यासाठी एक चमचा मेथी एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्याचे पाणी गाळून वेगळे करा. हे पाणी हलके गरम करून प्या. मेथी केसांसाठीही फायदेशीर असते.

लिंबू आणि ग्रीन टी

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी (green tea) लोकप्रिय आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ग्रीन टी शरीरातील मेटॅबॉलिझम वाढवतो. त्यामध्ये कॅटेचिन असतात. हा एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट आहे. लिंबू (lemon) मिसळून ग्रीन टी प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

ग्रीन टी आणि पुदिना

ग्रीन टी (Green Tea) तसंच पुदिना (Mint) यात अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. या दोन्ही घटकांचं मिश्रण वजन कमी करण्यात मदत करतं. यामुळे पाचकद्रव्यं, एन्झाईम्स उत्तेजित होतात. पुदिन्यामुळे चरबी झपाट्यानं जळते. ग्रीन टी चयापचय वाढवते आणि चरबी घटवण्यास मदत करते.

First published:

Tags: Fat, Health, Health Tips, Weight loss