जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हिवाळ्यात या व्यायामासोबतच घ्या योग्य आहार; सांधेदुखीपासून मिळेल आराम

हिवाळ्यात या व्यायामासोबतच घ्या योग्य आहार; सांधेदुखीपासून मिळेल आराम

हिवाळ्यात या व्यायामासोबतच घ्या योग्य आहार; सांधेदुखीपासून मिळेल आराम

Winter Health Problems: हिवाळ्यातील गारवा आपल्यासोबत विविध आरोग्य समस्याही घेऊन येतो. खास करून हिवाळ्यात सांधेदुखीची (Joint pain) समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    **नवी दिल्ली 18 डिसेंबर :**साधारण नोव्हेंबर महिन्यापासून हिवाळा ऋतू (Winter Season) सुरू होतो. मात्र, यावर्षी पावसाळा लांबल्यानं आणि वातावरणातील अनपेक्षित बदलांमुळं नोव्हेंबर संपला तरी वातावरणात हिवाळ्यासारखा गारवा (Cold) जाणवत नव्हता. पण आता हळूहळू थंडी जाणवू लागली असून येत्या काही दिवसात काही राज्यांना थंडीच्या लाटेचा (Cold Wave) सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. हिवाळ्यातील गारवा आपल्यासोबत विविध आरोग्य समस्याही (Winter Health Problems) घेऊन येतो. खास करून हिवाळ्यात सांधेदुखीची (Joint pain) समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. सध्याच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमुळं (Lifestyle) फक्त ज्येष्ठ नागरिकच नाही तर तरुणांना देखील हिवाळ्यात सांधेदुखीचा सामना करावा लागत आहे. तुमच्या किंवा नातेवाईकांच्या घरांमध्ये तुम्हाला ही सांधेदुखीची समस्या अगदी सहज दिसेल. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही लोक विविध प्रकारच्या अॅलोपॅथी औषधांची मदत घेतात तर काहीजण विविध मसाज तेलांचा (Oils) आधार घेतात. यासाठी भरपूर पैसेही खर्च करतात. उपाय करूनही कधीकधी सांधेदुखीपासून आराम मिळत नाही. तज्ज्ञ म्हणतात की, हिवाळ्यात आपल्या शरीरातील पेन रिसेप्टर्स (Pain Receptors) अधिक संवेदनशील होतात. शिवाय वातावरणाचा दाब (atmospheric pressure) कमी झाल्यामुळे सांध्याजवळील ऊती (Tissue) फुगतात. यामुळं सांध्यांमध्ये ताण निर्माण होतो व वेदना होतात. अनेक गुणधर्मांनी समृद्ध जास्वंदीचं फूल आरोग्यासाठी आहे फायदेशीर, असा करा वापर दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात, अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. यश गुलाटी यांनी सांगितलं की, रक्ताभिसरणाचा वेग मंदावणं हे सांधेदुखीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्यामुळे हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासोबतच शरीराची हालचाल करणं आणि चांगला आहार घेणं गरजेचं आहे. या दोन गोष्टींचं पालन केल्यास हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या जाणवणार नाही. योगासनांमुळे होईल फायदा सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांसाठी योगासनं (Yoga) सर्वात जास्त फायदेशीर आहेत. विशेषत: वॉरियर पोझ-1 (Warrior Pose-1) म्हणजेच वीरभद्रासनासारखी योगासनं सांधेदुखीवर प्रभावी ठरतात. यामुळे खांदे, हात आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. या आसनामुळे मांड्या, पिंडऱ्या आणि घोटे मजबूत होतात. याशिवाय सांध्यांमधील हालचाल सुलभ होते. अशा प्रकारे कराल वीरभद्रासन सर्व प्रथम ताडासनाच्या स्थितीमध्ये उभे रहा. यानंतर तुमच्या पायांत 3 ते 4 फूटांचं अंतर घ्या. तुमचा डावा पाय 45 ते 60 अंशांवर ठेवा आणि कंबरेवरचं शरीर 90 अंशापर्यंत फिरवा. त्यानंतर दोन्ही हात वर ताणून ते एकमेकांना जोडा. आता तुमची मांडी जमिनीला समांतर राहील अशा पद्धतीनं उजवा गुडघा वाकवा. शेवटी तुमचं डोकं वर करा आणि नजर बोटांकडे न्या. 20 ते 30 सेकंद याच स्थितीमध्ये थांबा. नंतर हळूहळू याच क्रमाने उलट कृती करून या आसनातून बाहेर या. तुमच्या बाळाचे केस विरळ झालेत का? घरच्या-घरी हे नैसर्गिक उपाय करून पहा परिणाम चांगल्या आहाराचा (Diet) होईल फायदा हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळवायचा असेल तर व्यायामासोबत चांगला आहाराचीही घ्यावा लागेल. हिवाळ्यात अक्रोड आणि फ्लेक्ससीडसारख्या ओमेगा 3 फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळं सांध्याची सूज कमी होते. पालक, कोबी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये आढळणारं ‘व्हिटॅमिन के’ हाडं मजबूत करतं. याशिवाय व्हिटॅमिन सीमुळं कार्टीलेजमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात