मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Hibiscus Flower Benefits: अनेक गुणधर्मांनी समृद्ध जास्वंदीचं फूल आरोग्यासाठी आहे फायदेशीर, असा करा वापर

Hibiscus Flower Benefits: अनेक गुणधर्मांनी समृद्ध जास्वंदीचं फूल आरोग्यासाठी आहे फायदेशीर, असा करा वापर

जास्वंदीच्या फुलात असलेले औषधी गुणधर्म मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह तोंडातील अल्सर आणि अॅनिमियाच्या समस्येवर देखील फायदेशीर आहेत.

जास्वंदीच्या फुलात असलेले औषधी गुणधर्म मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह तोंडातील अल्सर आणि अॅनिमियाच्या समस्येवर देखील फायदेशीर आहेत.

जास्वंदीच्या फुलात असलेले औषधी गुणधर्म मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह तोंडातील अल्सर आणि अॅनिमियाच्या समस्येवर देखील फायदेशीर आहेत.

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : त्वचा आणि केसांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी जास्वंदीचे फूल खूप फायदेशीर आहे. याचा वापर करून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या त्रासावरही फायदेशीर (Hibiscus Flower Benefits) ठरतात.

त्वचा आणि केसांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी जास्वंदीचे फूल (Hibiscus Flower) खूप फायदेशीर आहे. 'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार जास्वंदीच्या फुलात असलेले औषधी गुणधर्म मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह तोंडातील अल्सर आणि अॅनिमियाच्या समस्येवर देखील फायदेशीर आहेत.

खोकला आणि सर्दी (Cough and Cold)

जास्वंदीच्या फुलामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. सर्दी आणि फ्लूच्या समस्येमध्ये जास्वंदीपासून बनवलेला चहा प्या. याचा चांगला फायदा होईल.

अशक्तपणा

जास्वंदी फूल लोहाचा खूप चांगला स्रोत आहे. अॅनिमियाच्या समस्येमध्ये याच्या सेवनाने तुम्हाला फायदा होईल.

उच्च रक्तदाब

जास्वंदीच्या पानांपासून बनवलेला चहा शरीराला आराम देण्यास मदत करतो. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी याचे सेवन खूप फायदेशीर आहे.

मधुमेह

जास्वंदीचा चहा तणाव कमी करण्यात फायदेशीर आहे. यामुळे शरीरात तयार होणारे ट्रायग्लिसराइड्स कमी होते, ज्यामुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते.

तोंडातील अल्सर

तोंडात फोड येण्याची समस्या असल्यास जास्वंदीची 4-5 पाने चावून खावीत. याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि तोंडात भरपूर लाळ निर्माण होते, ज्यामुळे तोंडाच्या अल्सरमध्ये आराम मिळतो.

हे वाचा - Healthy Breakfast: सकाळी नाश्त्यामध्ये या गोष्टी खाणं आहे फायदेशीर; अनेक आजार राहतील दूर

वजन कमी करण्यासाठी

जास्वंदी एक नैसर्गिक चरबी-बर्नर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीरातील चयापचय वाढते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

त्वचेसाठी

जास्वंदीमध्ये म्युसिलेज नावाचा चिकट पदार्थ आढळतो. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते.

हे वाचा - Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, या आजारांचा धोका

केसांसाठी

केसांसाठी वाळलेल्या जास्वंदीच्या फुलांचा वापर हेअर पॅक किंवा हेअर मास्क म्हणून केला जाऊ शकतो. याशिवाय जास्वंदीची ताजी फुले आणि पाने खोबरेल तेलात उकळून लावावीत. याचा अधिक फायदा होईल.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips