मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Fenugreek leaves : मेथीची पाने इतक्या सगळ्या आजारांवर आहेत गुणकारी; जाणून घ्या सर्व फायदे

Fenugreek leaves : मेथीची पाने इतक्या सगळ्या आजारांवर आहेत गुणकारी; जाणून घ्या सर्व फायदे

Health benefits of Fenugreek leaves: एक ना दोन किती तरी समस्यांवर उपयुक्त आहे मेथी.

Health benefits of Fenugreek leaves: एक ना दोन किती तरी समस्यांवर उपयुक्त आहे मेथी.

Health benefits of Fenugreek leaves: एक ना दोन किती तरी समस्यांवर उपयुक्त आहे मेथी.

मुंबई, 31 डिसेंबर : मेथीची भाजी जवळपास सर्वांनाच आवडते. हिरव्या भाज्यांमध्ये अनेक घरांमध्ये तिचा आवर्जुन वापर केला जातो. मेथी भाजी विविध प्रकारे बनवली जाते. काहींना त्याचे पराठे आवडतात. मेथीच्या पानांचा (Fenugreek leaves) वापर मेथीच्या दाण्यांप्रमाणेच औषध म्हणून केला जाऊ शकतो. मेथीच्या पानांचे सेवन मधुमेह आणि हृदयाविकारांसह इतर अनेक आजारांमध्ये खूप फायदेशीर आहे. यामध्ये आयर्न, सेलेनियम, कॅल्शियम, मँगनीज, मिनरल्स आणि झिंकसारखे पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जाणून घेऊया मेथीची पाने कोणत्या रोगांवर (Health benefits of Fenugreek leaves) फायदेशीर आहेत.

हिरवी मेथीची पाने टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मेथी खाल्ल्याने रक्ताभिसरणही सामान्य राहते. मेथीमुळे चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवण्यास आणि शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

मेथीच्या पानांमध्ये असलेले फायबर पचनक्रिया चांगली ठेवते. मेथीमुळे बद्धकोष्ठतेसारखे त्रासही कमी होतात.

उच्च रक्तदाबावरही मेथीच्या पानांचा फायदा होतो. यामध्ये गॅलेक्टोमनन आणि पोटॅशियमची असल्याने रक्त परिसंचरण नियंत्रित राहते.

मेथीची पाने खाल्ल्याने वजन कमी करण्यासही मदत होते.

हे वाचा - Corona Booster Dose : तुम्हाला केव्हा मिळेल बूस्टर डोस? SMS द्वारे मिळणार माहिती

मेथीच्या पानांचा आहारात समावेश केल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटात अल्सर आणि आतड्यांमध्ये सूज येण्याची समस्या देखील कमी होते.

मेथीच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील जळजळ कमी होते. खोकला कमी होतो, ब्राँकायटिस, एक्जिमा यांसारख्या आजारांशी लढण्यात उपयुक्त आहे.

मेथीच्या पानांच्या सेवनाने पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढते.

मेथी खाल्ल्याने स्तनपान करणाऱ्या मातांचे दूध तयार होण्यास, वाढण्यास मदत होते.

हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?

रोज एक चमचा मेथीच्या पानांचा रस घेतल्याने पोटातील जंत नाहीसे होतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle