मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /चपाती की भात? वजनावर नेमका कशाचा होतो परिणाम, आहारतज्ज्ञांनी दिलं उत्तर

चपाती की भात? वजनावर नेमका कशाचा होतो परिणाम, आहारतज्ज्ञांनी दिलं उत्तर

वजन घटवण्यासाठी चपाती की भात?

वजन घटवण्यासाठी चपाती की भात?

काही जण वजन कमी होण्यासाठी चपाती उपयुक्त आहे असं मानतात, तर काही जणांना भात आवश्यक वाटतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    मुंबई, 16 मार्च : प्रत्येकाच्या खाण्याच्या पद्धती भिन्न असतात. त्याचा परिणाम त्यांच्यावर दिसून येतो. कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ कमी खाऊन वजन कमी करू शकता हे तुम्हाला माहिती असेल; पण जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा काही महत्त्वाची तत्त्वं ध्यानात घेणं गरजेचं असतं. वजन कमी करण्यासाठी आहारात आवश्यक तो बदल करण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी व्हावं, यासाठी काही जण चपाती खाणं बंद करतात, तर काही जण भातापासून दूर राहतात. फक्त चपाती खाल्ल्याने वजन लवकर कमी होतं की भात, याविषयी अनेकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. काही जण वजन कमी होण्यासाठी चपाती उपयुक्त आहे असं मानतात, तर काही जणांना भात आवश्यक वाटतो.

    डाएटिशियन पूनम दुनेजा यांच्या मते, `भात आणि चपाती या दोन्हींच्या पौष्टिक मूल्यांमध्ये मोठा फरक आहे. हे दोन्ही पदार्थ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. आठवड्यातून चार दिवस चपाती खात असाल तर दोन दिवस भात खावा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आहारात वैविध्य राखू शकता. निरोगी व्यक्ती वजन कमी करण्यासाठी चपाती आणि भात असे दोन्ही पदार्थ खाऊ शकतात. तसंच वजन कमी करण्यासाठी कधीही उपाशी राहू नये. कारण यामुळे तुमच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.`

    डाएटिंग, सर्जरी, औषध काहीच नाही; फक्त एका सिम्पल ट्रिकने 294 किलोची व्यक्ती 129 किलोची झाली

    कोणत्या प्रकारची भाकरी आणि भात आरोग्यासाठी फायदेशीर आहे?

    तज्ज्ञांच्या मते, ज्वारी, नाचणी आणि बाजरीची भाकरी वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानली जाते. भाकरीत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे इन्सुलिनची पातळी वेगाने वाढत नाही. त्यात फायबर आणि प्रथिनंही मोठ्या प्रमाणात असतात. ज्वारी, बाजरी आणि नाचणीची भाकरी अतिशय पौष्टिक असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. भाताचा विचार केला तर, तुम्ही आहारात ब्राउन राइसचा समावेश करू शकता. पाणी काढून टाकलेल्या पांढऱ्या भाताचं सेवनही करू शकता. त्यामुळे भात आणि चपाती किंवा भाकरीचं सेवन एका ठराविक प्रमाणात केलं पाहिजे.

    डाएटिशियनच्या मते, चपातीत ग्लुटेन असतं, तर भात ग्लुटेन फ्री असतो. ज्यांना ग्लुटेन खाल्ल्याने त्रास जाणवतो, त्यांनी चपाती कमी आणि भात जास्त खावा. तथापि डायबेटिसच्या रुग्णांसाठी भातापेक्षा भाकरी किंवा चपाती अधिक उपयुक्त आहे. डायबेटिस असलेल्यांनी भात खाऊ नये, अन्यथा रक्तातली ग्लुकोजची पातळी बिघडू शकते. वजन कमी करण्यासाठी निरोगी व्य.क्ती भात आणि भाकरी, चपाती योग्य प्रमाणात खाऊ शकतात.

    एका महिन्यात वाढेल वजन आणि दिसाल सुडौल, आहारात करा या 5 पदार्थांचा समावेश

    वजन कमी करण्यासाठी 10 महत्त्वाच्या टिप्स

    - फायबर्सचं सेवन वाढवावं. रोज 40 ग्रॅम फायबर्सचं सेवन करावं.

    - भरपूर पाणी प्यावं. रोज किमान दोन ते तीन लीटर पाणी पिणं आवश्यक आहे.

    - आहारात मीठ आणि साखरेचा समावेश कमी प्रमाणात असावा.

    - रिफाइंड, प्रक्रियायुक्त आणि जंक फूडचं सेवन टाळावं.

    - रोज शारीरिक हालचाली कराव्यात.

    - व्यायाम आणि मसल वेट ट्रेनिंग योग्य प्रकारे करावं.

    - गरजेनुसार जीवनशैलीत बदल करावा.

    - अन्नपदार्थ आणि पेय यांचं प्रमाण नियंत्रणात असावं.

    - धूम्रपान आणि मद्यपान टाळावं.

    First published:
    top videos

      Tags: Lifestyle, Weight, Weight loss, Weight loss tips