मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /डाएटिंग, सर्जरी, औषध काहीच नाही; फक्त एका सिम्पल ट्रिकने 294 किलोची व्यक्ती 129 किलोची झाली

डाएटिंग, सर्जरी, औषध काहीच नाही; फक्त एका सिम्पल ट्रिकने 294 किलोची व्यक्ती 129 किलोची झाली

वजन कमी करण्यासाठी लोक अनेकप्रकारे प्रयत्न करतात. व्यायाम, औषधांचा वापर, आहारावर नियंत्रण आणि शस्त्रक्रिया करून वजन कमी करण्याकडे लोकांचा कल असतो.

वजन कमी करण्यासाठी लोक अनेकप्रकारे प्रयत्न करतात. व्यायाम, औषधांचा वापर, आहारावर नियंत्रण आणि शस्त्रक्रिया करून वजन कमी करण्याकडे लोकांचा कल असतो.

वजन कमी करण्यासाठी लोक अनेकप्रकारे प्रयत्न करतात. व्यायाम, औषधांचा वापर, आहारावर नियंत्रण आणि शस्त्रक्रिया करून वजन कमी करण्याकडे लोकांचा कल असतो.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 15 मार्च : लठ्ठपणा ही आरोग्यविषयक एक गंभीर समस्या आहे. अतिलठ्ठपणामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं आरोग्यासाठी हितावह असतं. वजन कमी करण्यासाठी लोक अनेकप्रकारे प्रयत्न करतात. व्यायाम, औषधांचा वापर, आहारावर नियंत्रण आणि शस्त्रक्रिया करून वजन कमी करण्याकडे लोकांचा कल असतो.

  अमेरिकेतील निकोलस क्राफ्ट नावाच्या व्यक्तीनं त्याचं 165 किलो वजन कमी केलं आहे. 2019 मध्ये निकोलसचं वजन 294 किलो होतं. त्याने 165 किलो वजन कमी केल्याने आता त्याचं वजन 130 किलो आहे. यासाठी त्याने औषधं, सर्जरीचा पर्याय न निवडता आहारात मोठा बदल केला. निकोलसनं एवढं वजन कमी करण्यासाठी नेमकं काय केलं, ते जाणून घेऊया. आजतकने या विषयी माहिती दिली आहे.

  हेल्दी डाएट आणि एक्सरसाइजनेही कमी होत नाही वजन? 'हे' असू शकते कारण, वाचा उपाय

  सातत्याने वजन वाढत राहिलं तर संबंधित व्यक्तीला उच्च रक्तदाब, डायबेटिस, हृदयविकार, फॅटी लिव्हरसह विविध आजार जडण्याचा धोका असतो. जर वजन नियंत्रणात राहिलं तर गंभीर आजारांचा धोका कमी होतो. सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. या व्यक्तीने एवढं वजन कमी केलंय की त्याला ओळखणंदेखील कठीण झालंय. अमेरिकेतील मिसिसिपी येथे राहणाऱ्या 42 वर्षांच्या निकोलस क्राफ्टचं वजन जून 2019 मध्ये 294 किलो होतं. पण त्याने आता 165 किलो वजन कमी केलं असून, सध्या त्याचं वजन 130 किलो आहे.

  5 फूट 9 इंच उंची असलेल्या निकोलसने एका मुलाखतीत सांगितले, "मी लहानपणापासून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत होतो. मी शारीरिकदृष्टया अ‍ॅक्टिव्ह नसल्याने माझं वजन मोठ्या प्रमाणात वाढले. वजन जास्त असल्याने मला कोणत्याही समारंभ, कार्यक्रमाला जाता येत नव्हते. मला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापरही करता येत नव्हता. मला चालणं-फिरणंदेखील मुश्किल झालं होतं. मला गुडघेदुखी, अंगदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होत होता."

  "मी जर माझ्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर येत्या तीन ते पाच वर्षांत माझा मृत्यू होऊ शकतो, असं मला 2019 मध्ये एका डॉक्टरने सांगितलं. जर दीर्घायुष्य हवं असेल तर मला माझ्या जीवनशैलीत बदल करावा लागेल, अशी जाणीव मला झाली. वजन कमी करण्यासाठी मला माझ्या आजीने मदत केली. ती मला वजन कमी करण्यासाठी प्रेरणा देत होती. पण दुर्देवाने 2019 मध्ये तिचे निधन झाले. तिला मला सडपातळ होताना पाहायचे होते. मी वजन कमी करेन असं वचनही तिला दिलं होतं." असं निकोलसने सांगितले.

  "मी वजन कमी करण्यासाठी औषधं किंवा सर्जरीसारख्या पर्यायांचा वापर केला नाही. वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट न वापरण्याचा माझा लोकांना सल्ला आहे. आपलं वजन नैसर्गिक पद्धतीनं कमी झालं पाहिजे. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कदाचित जास्त वेळ लागू शकतो, पण त्याचे रिझल्ट दीर्घकाळ टिकतात. मी जरी वेट लॉस गोलपर्यंत अद्याप पोहोचलेलो नसलो तरी माझी कहाणी लोकांना प्रेरणा देणारी ठरू शकते, हे ऐकून मला चांगलं वाटतं." असं निकोलसने सांगितलं.

  Height Increase Tips : मुलांची उंची वाढवायचीये? रोज 2 मिनिटे करा एक्स्पर्टने सांगितलेले हे काम

  निकोलस म्हणाला, "वजन कमी करण्यासाठी मी कोणतंही सक्तीचं डाएट केलं नाही. मी माझ्या आहारात आणि खाण्याच्या पद्धतीत बदल केला. रोज आहारातील कॅलरी मोजण्यास सुरुवात केली. त्यासोबतच मी सोडा, तळलेले पदार्थ, ब्रेड, पास्ता, भात आणि अन्य कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ आहारातून वगळले. त्याऐवजी फळं, भाज्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला. तसेच रोज पायी चालण्यावर भर दिला. डंबेल्सच्या मदतीने वर्कआउट सुरू केलं. आता वजन कमी केल्याने मला अंगदुखीचा किंवा श्वासाशी संबंधित कोणताही त्रास होत नाही. मला उत्साही वाटतं. माझा आत्मविश्वास वाढला आहे. विशेष म्हणजे बाजारात आता माझ्या मापाचे कपडे मिळत असल्याने मला समाधान वाटत आहे." सोशल मीडियावर व्हायरल झालेले निकोलसचे फोटो पाहता, त्याच्या शरीरयष्टीत झालेला मोठा बदल लगेच लक्ष वेधून घेतो.

  (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

  First published:
  top videos

   Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips