मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /एका महिन्यात वाढेल वजन आणि दिसाल सुडौल, आहारात करा या 5 पदार्थांचा समावेश

एका महिन्यात वाढेल वजन आणि दिसाल सुडौल, आहारात करा या 5 पदार्थांचा समावेश

आकर्षक शरीरासाठी वजन कमी करणे जितके आव्हानात्मक आहे, तितकेच दुबळेपणा दूर करणेदेखील सोपे काम नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला चांगले व्यक्तिमत्व बनवायचे असेल आणि तुमचे वजन वाढवायचे असेल तर देशी आहाराच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन झपाट्याने वाढवू शकता.

आकर्षक शरीरासाठी वजन कमी करणे जितके आव्हानात्मक आहे, तितकेच दुबळेपणा दूर करणेदेखील सोपे काम नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला चांगले व्यक्तिमत्व बनवायचे असेल आणि तुमचे वजन वाढवायचे असेल तर देशी आहाराच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन झपाट्याने वाढवू शकता.

आकर्षक शरीरासाठी वजन कमी करणे जितके आव्हानात्मक आहे, तितकेच दुबळेपणा दूर करणेदेखील सोपे काम नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला चांगले व्यक्तिमत्व बनवायचे असेल आणि तुमचे वजन वाढवायचे असेल तर देशी आहाराच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन झपाट्याने वाढवू शकता.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 मार्च : लोक चांगले व्यक्तिमत्वासाठी जिममध्ये जातात आणि वजन कमी करण्यासाठी घाम गाळतात. त्याचप्रमाणे ज्यांचे वजन खूपच कमी आहे, त्यांच्यासाठी वजन वाढवणे सोपे काम नाही. वर्कआऊट देखील वजन वाढवण्यासाठी खूप मदत करू शकते. मात्र यासाठी वर्कआऊटसह तुमचा आहार समृद्ध करणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या पातळपणामुळे हैराण असाल आणि चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी स्नायू मिळवू इच्छित असाल तर तुम्ही तुमच्या आहारात देशी पदार्थांचा समावेश करू शकता.

तुम्ही आहारात या पदार्थांचा समावेश करून एका महिन्यात फायदे मिळवू शकता. बाजारात उपलब्ध असलेल्या प्रोटीन सप्लिमेंट्स किंवा वजन वाढवणाऱ्या औषधांपेक्षा हे जास्त फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते घरगुती उपाय करून तुम्ही तुमचे वजन वाढवू शकता.

हेल्दी डाएट आणि एक्सरसाइजनेही कमी होत नाही वजन? 'हे' असू शकते कारण, वाचा उपाय

तुपासोबत साखरेचा वापर : स्टाइलक्रेसच्या एका रिपोर्टनुसार, जर तुम्हाला तुमचे वजन हेल्दी पद्धतीने वाढवायचे असेल तर साखर आणि तूप खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही एक चमचा तुपात एक चमचा साखर मिसळा आणि जेवणाच्या अर्धा तास आधी हे मिश्रण खा. एक महिना दररोज असे केल्याने तुमचे वजन वेगाने वाढेल.

सुक्या अंजिरासोबत मनुका खाणे : वजन वाढवण्यासाठी तुम्ही अंजीर आणि मनुका खाऊ शकता. यासाठी 5 सुके अंजीर आणि सुमारे 30 ग्रॅम मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खा. 1 महिन्याच्या आत तुम्हाला तुमचे शरीर मजबूत दिसेल.

दुधासोबत केळी खाणे : तुम्ही सकाळच्या नाश्त्यात एक ग्लास दुधासोबत दोन केळी खाऊ शकता, हवं असल्यास शेक बनवून पिऊ शकता. केळी आणि दुधाच्या सेवनाने शरीरावर झपाट्याने फरक दिसून येतो. वास्तविक केळी आणि दुधात भरपूर कॅलरीज असतात, जे तुमचे वजन वाढवण्यास मदत करतातच. शिवाय ते तुम्हाला मजबूत बनवतात.

आंब्यासोबत दुधाचा वापर : पातळपणा दूर करण्यासाठी तुम्ही आंबा आणि दूध एकत्र नाश्ता म्हणून खाऊ शकता. यासाठी रोज दोन पिकलेले आंबे खावेत आणि आंबे खाल्ल्यानंतर कोमट दूध प्यावे. काही दिवसातच तुमच्या शरीरात फरक दिसून येईल.

ड्रायफ्रुट्स आणि बियांचा वापर : जर तुम्ही शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे इत्यादींचे रोज सेवन केले तर तुम्हाला त्याचा अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी मूठभर ड्रायफ्रुट्स खाल्ल्यास फायदा होईल. तुमच्या दुबळेपणावर त्याच्या वापराने सहज मात करता येते.

Height Increase Tips : मुलांची उंची वाढवायचीये? रोज 2 मिनिटे करा एक्स्पर्टने सांगितलेले हे काम

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight gain