अभिषेक रंजन, प्रतिनिधी मुजफ्फरपूर, 3 जून : आंब्याचे चाहते भारतातच नाही, तर पूर्ण दुनियेत आढळतात. परंतु ज्यांना मधुमेह जडलेला असतो, त्यांना मात्र आंब्याचा हवा तसा आनंद घेता येत नाही. तुम्हीदेखील त्यांच्यापैकी एक असाल तर आता अजिबात काळजी करू नका. कारण तुमच्यासाठी आहे एक गोड बातमी. होय, आंब्याइतकीच गोड. बिहारच्या मुजफ्फरपूरमधील बिंदा गावचे रहिवासी राम किशोर सिंह यांनी चक्क शुगर फ्री आंबा उगवला आहे. हा आंबा शुगर फ्री असला तरी गोड मात्र तितकाच आहे बरं का…
राम किशोर सिंह यांना साल 2008पासून मधुमेहाने जखडले. तेव्हापासून त्यांना मनासारखे आंबे खाता यायचे नाहीत. मग त्यांच्या मनात शुगर फ्री आंबा उगवण्याची भन्नाट कल्पना आली. त्यांच्या या कार्यासाठी जळगावात ASM फाउंडेशनकडून त्यांना उद्यान रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी कृषी क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळवले आहेत. चांदीची तार, सोन्याची पॉलिश; बनारसी साडीची किंमत एकदा ऐकाच! आता त्यांच्या या आंब्याची चर्चा सर्वत्र आहे. सर्वसामान्य आंब्याचं टीएसएस म्हणजेच टोटल सॉल्युबल सब्सटेंस 25 पर्यंत असतं, तर या आंब्याचं टीएसएस 12-13 असेल. या आंब्याची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली असून त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या आंब्याचं रोप राम किशोर सिंह यांच्या नर्सरीत उपलब्ध असून 4,000 रुपये इतकी त्याची किंमत आहे.