चेन्नई, 03 मार्च : बरेच लोक नाश्त्याला ब्रेड खातात. ब्रेड-ऑमलेट, जाम-ब्रेड, ब्रेड बटर अशीच ब्रेडच्या नाश्त्याची व्हरायटी असते. तसा ब्रेड नरम पण तरी तो मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतो. नुकतंच एक असं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका बॉडीबिल्डरच्या याच पावाच्या छोट्याशा तुकड्याने जीव गेला आहे. ब्रेडचा तुकडा खाताच त्याचा मृत्यू झाल आहे. तामिळनाडूतील हे धक्कादायक प्रकरण आहे. एम. हरिहरन असं बॉडीबिल्डरचं नाव आहे. 21 वर्षांचा हरिहरन सलेमच्या पेरिया कोलापट्टी भागाचा रहिवासी. राज्यस्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धेसाठी तो सराव करत होता. 70 वर्षांखालील गटात तो सहभागी होणार होता. कुड्डालोर जिल्ह्यातील वादालूरमध्ये ही स्पर्धा होत होती. हरिहरन तिथंच आला होता. तिथल्या एका वेडिंग हॉलमध्ये सर्व स्पर्धकांसह तो थांबला होता. इथं रात्री तो व्यायाम करत होता. वर्कआऊटमधून त्याने थोडा ब्रेक घेतला. या ब्रेकमध्ये त्याने ब्रेड खाल्ला आणि हाच ब्रेड त्याच्या मृत्यूचं कारण ठरला. साधासुधा नाही हा चौथरा! म्हणतात, याच्यावर पाठ घासताच गायब होतात पाठीच्या वेदना ब्रेड खाल्ल्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. बघता बघता तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तातडीनं सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या घशात ब्रेडचा तुकडा अडकल्याने त्याने जीव गमावला.
घशात काही ना काही अडकल्याची बरीच प्रकरणं आहेत. बऱ्याचदा लहान मुलं चॉकलेट किंवा इतर छोट्या वस्तू गिळतात ज्या त्यांच्या घशात अडकतात. लहान मुलांच्या घशात काही अडकलं आणि ते दिसत असेल, तरच बोट घालून काढण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर ते आणखी आत जाईल. याशिवाय जर घशात काही अडकले आणि श्वास कोंडायला लागला तर त्या व्यक्तीच्या पाठीवर मारा ज्यामुळे अडकलेला पदार्थ तोंडात येईल. तोंड खाली करायला सांगा आणि व्यक्तीच्या छातीवर एक हात ठेवून दुसऱ्या हातानं कंबरेवर जोरजोरात मारावं. यामुळे अडकलेला पदार्थ बाहेर येणार. मृत्यूनंतरही बाळाला देता येतो जन्म आणि बरंच काही…; माणसांमध्ये आहेत या 8 चमत्कारिक गोष्टी सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं काही झालं तर त्या व्यक्तीला लगेच रुग्णालयात दाखल करावं.