जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! 9 महिने नव्हे तब्बल 9 वर्षे 'प्रेग्नंट' होती महिला; पोटातील बाळाला पाहून डॉक्टरही हैराण

OMG! 9 महिने नव्हे तब्बल 9 वर्षे 'प्रेग्नंट' होती महिला; पोटातील बाळाला पाहून डॉक्टरही हैराण

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

पोटात वेदना होऊ लागल्यानंतर ही महिला डॉक्टरांकडे आली आणि तिच्या पोटात 9 वर्षांचं बाळ पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 10 मार्च : सामान्यपणे प्रेग्नन्सी चा कालावधी 9 महिन्यांचा असतो. म्हणजे 9 महिने बाळ पोटात असतं. नवव्या महिन्यात डिलीव्हरी होते आणि बाळ आईच्या पोटातून बाहेर येते. काही वेळा 9   महिन्यांच्या आधी प्रसूती झाल्याचीही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल की एका महिलेच्या पोटात तिचं बाळ 9 महिने नव्हे तर तब्बल 9 वर्षे होतं. अमेरिकेतील हे धक्कादायक प्रकरण आहे. मूळची कांगोची असलेली ही महिला काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत आली. एक दिवस तिच्या पोटात अचानक दुखू लागलं. अपचनासारखं झालं. तिने रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. महिलेच्या पोटात भ्रूण होतं. तेसुद्धा 9 वर्षांचं. 9 वर्षांपूर्वी ही महिला प्रेग्नंट झाली होती. प्रेग्नन्सीच्या 28 व्या आठवड्यात तिला तिच्या पोटात बाळाची हालचाल जाणवली नाही. गर्भ वाढतही नव्हता. तेव्हा गर्भपात होणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही. अखेर महिला डॉक्टरांकडे गेली. त्यांनी तिला सांगितलं की मुलाचा श्वास थांबला आहे. त्यांनी काही गोळ्या लिहून दिल्या आणि याने गर्भपात होईल. असं सांगितलं आणि गर्भपात झाला नाही तर दोन आठवड्यांनी तिला पुन्हा बोलावलं. Shocking! एक वर्षाची चिमुकली ‘प्रेग्नंट’; पोटाऐवजी डोक्यात वाढत होतं मूल महिला जेव्हा क्लिनिकहून घरी गेली तेव्हा लोक तिला वाईट वाईट बोलू लागले. ती इतकी वैतागली ती मंदिरात गेली आणि देवाकडे प्रार्थना करू लागली. तेव्हा तिने बाळाला पोटातच ठेवण्याचा निर्णय घेतला.

News18लोकमत
News18लोकमत

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी जेव्हा पाहिले ते हे गर्भ दगड झालं होतं. महिलेच्या आतड्यांमध्ये ते अडकलेलं होतं. तिच्या आतड्या आकुंचित झाल्या होत्या. ती जे काही खात होती, ते तिला पचत नव्हतं आणि त्यामुळे कुपोषित झाली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा भ्रूण गर्भाशयाऐवजी पोटात विकसित होतो, तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. वैद्यकीय भाषेत याला लिथोपेडियन म्हणतात. पोटातील बाळाला पुरेसा रक्तपुरवठाही होत नाही आणि त्याचा विकास होणं बंद होतं. अशा स्थितीत शरीर भ्रूण बाहेर काढू शकत नाही. कारण तो चुकीच्या ठिकाणी असतो. जेव्हा भ्रूण गर्भावस्थेतत मृत होतं आणि ते शरीराबाहेर येत नाही, तेव्हा भ्रूणाची अशी अवस्था होते. त्यावर कॅल्शिअमचा थर जमा होतो आणि तो दगडासारखा दिसू लागतो. याला स्टोन बेबीही म्हणतात. हे अत्यंत दुर्मिळ आहे. जगभरात अशी फक्त 290 प्रकरणं समोर आली आहेत. सर्वात पहिलं प्रकरण 1582 साली फ्रान्समध्ये आढळून आलं होतं. नियतीचा अजब खेळ! एकाच वेळी 4 बाळांना जन्म देऊनही मिळालं आई होण्याचं सुख; रिकामी राहिली कूस याचा आईच्या आरोग्यावर गंभीर दीर्घकालीन परिणाम होतो. काही वेळा हार्ट अटॅकमुळे आईचा मृत्यू होऊ शकतो. काही महिला कित्येक दशकं जिवंतही राहिल्या आहेत. या प्रकरणा  या महिलेला एक दुर्मिळ आजार झाला. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.  काही दिवसांपूर्वी तिचा जीव गेला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात