मुंबई : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना स्वत:च्या हेल्थकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ज्यामुळे लोक कधीही जेवतात, कधीही झोपतात तसेच बाहेरचे पदार्थ खातात. ज्याचा त्रास होतो. तसेच कामाचं टेंशन अपूरी झोप यासगळ्यामुळे बहुतांश लोकांमध्ये हार्टअटॅक आणि कार्डियाक अरेस्ट सारख्या घटना वाढत आहेत. यासंबंधीचचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.
अगदी कमी वयाच्या मुलांपासून ते वयो-वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच हृदयाची संबंधीत आजारांनी ग्रासलं आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांना हार्टअटॅक आणि कार्डियाक अरेस्ट या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतात. पण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
हो, हे दोन्ही आजार हृदयाशी संबंधीत असले तरी मेडीकल भाषेत या दोन्ही आजारांची लक्षणं आणि उपचार वेगवेगळे आहे.
Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि...
आम्ही तुम्हाला हार्टअटॅक आणि कार्डियाक अरेस्ट दोन्ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या हृदयावर वाईट परिणाम होतो. हा आजार इतका गंभीर आहे की त्यामुळे एखाद्याचा जीव देखील जावू शकतो. परंतु घाबरण्यासारखं नाही, वेळीच उपचार मिळाला तर माणसाचे प्राण वाचवले जाऊ शकतात
डॉक्टरांच्या मते, हार्टअटॅक आणि कार्डियाक अरेस्टहे हृदयाचे आजार आहेत, जे रक्ताभिसरणाशी संबंधित आहेत. यामध्ये हार्टअटॅक येतो जेव्हा धमन्यांमधील रक्तप्रवाह थांबतो किंवा संपतो आणि हृदयाचा तो भाग ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बंद पडायला लागतो. तर दुसरीकडे, कार्डियाक अरेस्टमध्ये हृदयाचे ठोके अचानक थांबते. अशा परिस्थितीत व्यक्तीला काहीही होऊ शकते.
कार्डियाक अरेस्ट नेहमीच अचानक होतो, हे येण्यापूर्वी कोणतीही विशिष्ट चिन्हे दिसत नाहीत. यामध्ये हृदय शरीरात रक्त पंप करणे थांबवते आणि व्यक्ती बेशुद्ध पडते. या अवस्थेत त्वरित उपचार न मिळाल्यास काही मिनिटांतच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. हार्ट अटॅक आणि हृदयाच्या असामान्य ठोक्यामुळे कार्डियाक अरेस्ट येतो.
बेशुद्ध होणे हे हृदयविकाराचे मुख्य लक्षण आहे.
पुष्कळ वेळा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराच्या आधी खालीलपैकी काही लक्षणे जाणवू शकतात जी खालीलप्रमाणे आहेत
-असामान्य हृदयाचे ठोके
- चक्कर येणे किंवा गरगरल्या सारखं वाटणे
- छातीचा दुखणे
- श्वासाची समस्या
-मळमळ किंवा उलट्या
- धाप होणे
- पूर्णपणे बेहोश होणे
आजकाल दररोज हजारो लोकांना हार्ट अटॅक येतो, असा एक रिसर्च समोर आला आहे. रक्त गोठणे किंवा हृदयात रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हार्ट अटॅक स्थिती निर्माण होते. हार्ट अटॅक हा मुख्यतः कोरोनरी धमन्यांमधील अडथळ्यामुळे होतो, जो हृदयाला गंभीर नुकसान करून व्यक्तीसाठी धोकादायक ठरू शकतो आणि व्यक्तीचा जीवही घेऊ शकतो.
हार्ट अटॅकची लक्षणे अचानक दिसून येत असली, तरी अनेक प्रकरणांमध्ये काही दिवस किंवा आठवडे आधी काही सौम्य लक्षणे जाणवू शकतात. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि महिला किंवा पुरुषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतात, जसे की-
- अस्वस्थता आणि छातीत दुखणे
-श्वास घेताना त्रास
- भरपूर घाम येणे
- जलद हृदयाचा ठोका
-हात, पाठ, मान, जबडा आणि ओटीपोटात वेदना आणि जळजळ
- चक्कर येणे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heart Attack, Heart risk, Lifestyle, Tips for heart attack