जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पोटासाठी जणू 'अमृत'चं! उन्हात थंड राहायचं असेल, तर 'हा' रस प्यायलाचं हवा

पोटासाठी जणू 'अमृत'चं! उन्हात थंड राहायचं असेल, तर 'हा' रस प्यायलाचं हवा

पोटासाठी जणू 'अमृत'चं! उन्हात थंड राहायचं असेल, तर 'हा' रस प्यायलाचं हवा

तुम्हीही सध्याच्या कडक उन्हात सतत घामाघूम होत असाल, आतून बाहेरून अंगाची आग होत असेल, तर तुम्हाला ‘या’ फळाविषयी माहिती असायलाच हवी.

  • -MIN READ Local18 Madhya Pradesh
  • Last Updated :

अरविंद शर्मा, प्रतिनिधी भिंड, 7 जून : बापरे! किती हा उकाडा…दुपारी रस्त्यावरून चालताना अंगाची ल्हाई ल्हाई होते नुसती. काहीतरी थंडगार प्यावं असं वाटत राहतं पण थंड प्यायलं तरी नुसतं जिभेला बरं वाटतं. पोटातल्या आगीचं काय…? तुम्हीही असेच सध्याच्या कडक उन्हात सतत घामाघूम होत असाल, आतून बाहेरून अंगाची आग होत असेल, तर तुम्हाला ‘या’ फळाविषयी माहिती असायलाच हवी. हे फळ म्हणजे दुसरं, तिसरं कोणतं नाही, तर आपलं ‘बेलफळ’ आहे. उन्हाच्या तडाख्यावर आणि पोटातल्या आजारांवर हे फळ म्हणजे एक रामबाण उपायच असतं. अर्धा पिकलेला किंवा पूर्ण पिकलेला बेलचा गर खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. बेलफळ पोटाला शक्ती देतं आणि त्याची कार्य करण्याची क्षमता वाढवतं. महत्त्वाचं म्हणजे, बेलाच्या झाडाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान शंकरांना बेलाची पानं आवडतात. तर आपल्या आरोग्यालादेखील या पानांचा आणि फळांचा फार उपयोग होतो. बेलफळांचा रंग सोनेरी पिवळट हिरवा असतो. तर, त्याचा सुगंध अगदी चंदनासारखा येतो. या फळांमध्ये पाणी, फॅट्स, प्रोटीन, ऊर्जा, कार्बोहायड्रेट्स, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, जीवनसत्त्व ए, बी, सी, भरपूर प्रमाणात असतात. इंग्रजीत या फळाला ‘वूड ऍपल’ असं म्हटलं जातं.

News18लोकमत
News18लोकमत

बेलफळाचा रस पोटाचं आरोग्य राखण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतो. या फळाचं सेवन बद्धकोष्ठता, जुलाब आणि पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी वर्षानुवर्षे केलं जातं. पोटात आग पडली असेल तर या फळाच्या रसामुळे आराम मिळतो. पोट शांत झाल्याने ते व्यवस्थित साफही होतं. पोटात अल्सरचा त्रास होत असताना बेल खाणं फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर बेलमध्ये टॅनिनचं प्रमाण जास्त असल्याने ते कॉलराच्या उपचारासाठी सर्वोत्तम मानलं गेलं आहे. शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रसामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल प्रमाणात राहण्यास मदत होते. शरिरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं की, हृदयरोग, वजनवाढ, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे या रसाचं सेवन अत्यंत फायदेशीर ठरतं. परंतु लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीचे जसे चांगले परिणाम असतात तसेच वाईटही परिणाम असतात. बेलाचा रस कितीही फायदेशीर असला तरी त्यात साखरेचं प्रमाण प्रचंड असतं. त्यामुळे त्याचं अतिसेवन आपल्या शरीरास धोकादायकही ठरू शकतं. मधुमेहाच्या रुग्णांनी या रसाचं सेवन शक्य तितकं टाळावं, तर मधुमेहाचा त्रास नसेल तरीही या रसाचं सेवन प्रमाणातच असायला हवं. lalbag ganpati 2023: लालबाग राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन संकष्टीला संपन्न; मूर्तीच्या बांधणी सुरुवात खरंतर फायदे-तोटे काहीही असले तरी हे फळ चवीला अतिशय स्वादिष्ट असतं, हे नक्की. त्याचा रस आपण घरातही बनवू शकता. आज आपण रेसिपी जाणून घेऊया. पहिल्यांदा बेलफळ स्वच्छ धुवून घ्या. मग त्याचे तुकडे करून एका भांड्यात ठेवा. रस तयार करण्यासाठी 2 ग्लास पाणी घेऊन त्यात बेलाचे तुकडे बारीक बारीक चुरून घ्या. बेल आणि पाणी छान एकजीव झाल्यावर त्यात चवीनुसार/आवडीनुसार साखर घाला. त्यानंतर रस एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात गाळणीने गाळून घ्या. बेलाच्या जाड, मऊ रसात आता 2 ग्लास थंड पाणी घाला. अशाप्रकारे तुमचा थंडगार बेलाचा रस पूर्णपणे तयार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात