लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज पहाटेच साधेपणानं लालबागच्या राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन केलं.
लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनानंतर मूर्तीकार लालबागच्या राजाची गणेश मूर्ती साकारण्यास सुरुवात करतात.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे 90 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन आज संकष्ट चतुर्थीला पार पडले.
आज बुधवार दि. 07 जून 2023 रोजी सकाळी 06.00 वा. मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे श्री. रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडले.